निलंगा तालुक्यात मान्सूनचे जोरदार आगमन
निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात मान्सूनचे जोरदार आगमन.
निलंगा ,दि १७(मिलिंद कांबळे)
निलंगा तालुक्यासतील मौजे कासार शिरसी व परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. काल वार मंगळवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक तासभर जोरदार मुसळधार पाऊस पडला.कासार सिरसी शहरामधील मार्केटमध्ये पाणीच पाणी झाले.या पडलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत.
या अगोदर फक्त जमिनीत पेरणी पुरता ओलावा निर्माण झाला होता.या परिसरात अगोदर पंचवीस ते तीस टक्के पेरणी झालेली आहे.आज पडलेल्या पावसामुळे येणाऱ्या काळात पेरणीला वेग येणार आहे.यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणी होत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मूग,उडीद,तूर सोयाबीन,आदी पिकावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे.
निलंगा : मिलिंद कांबळे
मो 9960049411
मो 8626000526
Comments
Post a Comment