महाराष्ट्रातील बौद्ध तरुणांवरील अत्याचार रोखण्याची मागणी

महाराष्ट्रातील बौद्ध तरुणांवरील वाढते अत्याचार थांबविण्याची मागणी

निलंगा ,दि १८(मिलिंद कांबळे)

फुले,शाहू,आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेत येणारे सरकार मग ते भाजप शिवसेनेचे असो,काँग्रेस राष्ट्रवादीचे असो की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे असो महाराष्ट्रात बौद्ध समाजावरील होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.हे वाढते अन्याय अत्याचार तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की ,महाराष्ट्र राज्यात मागील दोन ते तीन महिन्याच्या लॉक डाऊनच्या काळात बौद्ध, समाजासह ओ. बी. सी ,
आदिवासी तसेंच वंचित समाजावर जातीयवादातून अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्या असून घडलेल्या घटनेत बौद्ध तरुणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.मात्र राज्यसरकार या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे ? त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत चालले असून ते दिवसेंदिवस निर्ढावत आहेत.
    याबाबत वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मागील दोन ते तीन महिन्यात राज्यात ज्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची शान धुळीस मिळाली आहे.बौद्ध समाजावरील अन्याय झालेल्या घटनेत अरविंद बनसोड रा. पिंपळधारा ता. नरखेड जि .नागपूर यांची 27 मे रोजी हत्या करण्यात आली.त्याचा तपास हा व्यवस्थित होत नाही.खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पुणे पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप याच्या वर 5ते 6 जणांनी कट रचून हत्या केली. जळगाव जिल्ह्यातील दगडू धर्मा सोनवणे यांच्या कुटुंबियावर जातीयवादातूनच हल्ला करण्यात आला.सोलापुरी जि परभणी येथे ही हल्ला झाला,बीड जिल्ह्यातील पारधी कुटुंबातील हत्याकांड यासह बहुसंख्य ठिकाणी जातीयवादी मानसिकतेतून बौद्ध, अदिवासी ओ बी सी  व वंचित घटकातील समाज बांधवावर वर हल्ले करण्यात येत आहेत.
     कोरोना च्या काळात जग बंदिस्त असताना राज्यातील जातीयवाद उफाळून आला आहे.या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत.अशा अनेक घटनांच्या बाबतीत पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नाही.यामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा गुन्हेगारांना मिळतो.
दरम्यान, सरकार च्या वतीने वरील सर्व प्रकरणात काय व कोणती कारवाई केली.तसेच कारवाई कधी झाली याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यावी तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष युवराज जोगी, विजयकुमार सूर्यवंशी, अर्जुनअप्पा कटके,बालाजी कांबळे, प्रदीप सोनकांबळे,रोहन सुरवसे,झटिंग म्हेत्रे ,यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मिलिंद कांबळे, निलंगा
मो 9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..