नाभिक समाजाला आर्थिक मदतीची गरज
नाभिक समाजाला आर्थिक मदतीची गरज
निलंगा,दि 22(मिलिंद कांबळे)
18 मार्चपासून आजपर्यंत निलंगा तालुका व परिसरातील जवळपास शेकडो केस कर्तनालयाची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे जगायचे तरी कसे ?असा प्रश्न निर्माण झाल्याने सरकारने नाभिक समाजाला आर्थिक मदत करण्याची गरज आहे.असा प्रश्न निलंगा शहरासह तालुक्यातील नाभिक समाजातून उपस्थित केला जात आहे.
केश कर्तनालय चालवणाऱ्या आणि तेथे कारागीर म्हणून काम करणाऱ्या नाभिक समाजातील गरीब कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने काही अटींवर मुभा देण्यात आली असली तरी निलंगा तालुका परिसरातील मात्र केश कर्तनालयाला परवानगी देण्यात आली नाही, त्यामुळे दुकानाचे भाडे, कारागिरांची मजुरी थकली आहे. एकीकडे शासनाने दारू दुकानांना परवानगी दिली मात्र ज्या गरीब कुटुंबाचे हातावर पोट आहे अशा नाभिक समाजाला परवानगी दिली नसल्याने समाजावर अन्याय केला जात आहे असे नाभिक समाजाच्या अनेक कारागीरांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
निलंगा : मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment