बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या त्या तरुणाने मागितली अखेर माफी !
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल फेसबूकच्या माध्यमातून वादग्रस्त लिखाण केलेल्या त्या जातीयवादी तरुणाने अखेर माफी मागितली आहे.
मौजे मसलगा ता. निलंगा जि. लातूर या गावात राहणारा पंकज जाधव या तरुणाने फेसबुकवर बाळासाहेबांबद्दल वादग्रस्त आक्षेपाहार्य लिखाण केला होता.
याबाबतची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित तरुण राहत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधला. तेथील पोलीस पाटील, सरपंच व त्या मुलाचे वडिल या व्यक्तींना फोनवरून घटनेची माहिती दिली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी पंकज जाधवला गावासमोर बोलावून घेतले. गावातील लोकांनी पंकज जाधवला जाब विचारला व घडलेल्या प्रकाराबाबत माफीचा व्हिडिओ तयार करून माफी मागायला सांगितली. फेसबूकच्या माध्यमातून जे वादग्रस्त लिखाण केले त्या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळीं समोर पंकज जाधव याने माफीचा व्हिडिओ तयार करून बाळासाहेबांची माफी मागितली. लातूरच्या सर्व कार्यकर्त्यानी फेसबुकवर बाळासाहेबांच्या विरोधात पोस्ट पाहिल्यानंतर रात्रभर पंकज जाधवची माहिती घेऊन सकाळी निलंगा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरवात केली, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पंकज जाधव याने माफी मागितल्याने त्याच्याविरोधात होणारी कायदेशीर कार्यवाही मात्र टळली आहे.
निलंगा / मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment