निलंगा तालुक्यातील नणंद गावात एका परिवारास दोन वृक्षांची भेट.

निलंगा तालुक्यातील नणंद गावात एका परिवारास दोन वृक्षांची भेट

निलंगा /मिलिंद कांबळे

झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या संकल्पनेतून (लातूर) निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील ग्रामपंचायतीकडून प्रत्येकी एका कुटुंबास दोन झाडे भेट देऊन एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.
    याबाबाबत अधिक माहिती अशी की, 2019 मध्ये पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा  घेण्यात  आली होती या स्पर्धेत नणंद येथील ग्रामस्थानी दिलेल्या भरीव योगदानामुळे,व सक्रिय सहभागामुळे नणंद गावाचा तालुक्यातून तीसरा क्रमांक आला  होता. तृतीय क्रमांकाचे पारितोषक म्हणून मिळालेली रक्कम चार लाख रुपये  ग्रामपंचायतकडे जमा असून त्यातून निसर्ग संवर्धन, जलसंवर्धन अशीच कामे करावीत असा आदेश जिल्हाधिकारी जी .श्रीकांत  यांनी दिला होता. त्यानूसार यातील पहिलं काम  हाती घेत  'वृक्षलागवड'. या कार्यक्रमा अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला २ केशर आंब्याची रोपे  देण्यात  आले. त्यासाठी 'केशर' जातीचे १५०० रोपे  मागवण्यात आले होते  हे वृक्ष  मराठवाड्यातील वातावरणात योग्य ती काळजी घेतली तर त्याची व्यवस्थित वाढ होऊन भविष्यात या झाडाला भरपूर फळधारणा होते . गावाने कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे हे फळ  आहे  असे मत  येथील जलमित्र  अमित पाटील, यांनी व्यक्त केले.
   यासाठी  गावातील जलमित्र ऋषिकेश म्हेत्रे,  संतोष घोडके, दत्‍ता सुर्यवंशी, किरण पाटील, मारुती टोपन्ना, श्याम गवारे, चैतन सूर्यवंशी, विनोद पाटील, विलास  बोळे, मधुर बिराजदार, नामदेव भोजने, मोहन म्हेत्रे, आदिनाथ वाघमारे, सागर पाटील, वैभव पेटकर,अजय दिवे, जुबेर शेख, फिरोज  मासुलदर, प्रमोद कुंभार आदींनी याकामासाठी परिश्रम घेतले.
 
निलंगा : मिलिंद कांबळे
मो 9960049411
मो 8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..