माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण...
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना कोरोनाची लागण...
निलंगा,दि१६ (मिलिंद कांबळे)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटिल-निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदानात आज दि(१६)रोजी निष्पन्न झाले. लातूर येथील खाजगी रुग्णालयात ते गेल्या चार-पाच दिवसांपासून उपचार घेत होते. दरम्यान काल त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.आज सकाळी त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला. अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून बरी नव्हती, त्यामुळे त्यांना लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे वय पाहता त्यांची कोरोना चाचणी देखील करून घेणे योग्य ठरेल असा सल्ला देण्यात आला होता. त्यानूसार काल त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.आज सकाळी स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला, तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. लातूरच्या आरोग्य विभागाकडून देखील या वृताला दुजोरा देण्यात आला आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कोणाच्याही संपर्कात आलेले नसतांना त्यांना कोरोनाची लागण कशी झाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचे वय अधिक असल्यामुळे कुटुंबियाकडून यापूर्वीच काळजी घेण्यात आली होती.परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लातूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. निलंगेकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.निलंगेकरांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यासह संपर्कातील अशा १३ जणांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे समजते. यापुर्वी महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह औसा येथील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व मृतांचे प्रमाण पाहता नुकताच लातूरमध्ये पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
निलंगा :मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment