मदनानंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

मदनसुरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची  परंपरा कायम
मदनसुरी :निलंगा तालुक्यातील मौजे मदनसुरी येथील मदनानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.
 निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील श्री मदनानंद शिक्षण संस्था संचलित मदनानंद मध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवले आहे, यात कला शाखेत एकूण 48 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 44 विदयार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले आहेत.विशेष प्राविण्य म्हणून शेख बुशरा महेबूब - 84%गुण घेऊन प्रथम तर
शिंदे तनुजा अभंग- 80% गुण घेऊन द्वितीय,तर
 काटे प्रियंका  76% गुण घेऊन तृतीय क्रमांक विद्यालयात आले आहेत . या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष बा.ली.माने,सचिव दिलीप पाटील, प्राचार्य माधवराव मुळे, प्रा.डॉ.आयुब पठाण, प्रा.टी.जी.खामकर, प्रा.ए.ए.कंधारे, सरपंच शिवाजी माने,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थस्तरातून कौतुक केले जाते आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..