नगरसेवक हरिभाऊ कांबळे यांच निधन
नगरसेवक हरीभाऊ कांबळे यांच निधन
निलंगा/मोहन क्षीरसागर
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक हरिभाऊ कांबळे यांच आज लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.
मृत्यू समयी ते ५२वर्षाचे होते.
ते पहिल्यांदा १९९६साली जनता दलाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले.२००१साली नगरअध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे बाबुराव नितनवरे यांनी त्यांचा एक हजार मताने पराभव केला होता.
पुन्हा२००६च्या नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत बाबूराव नितनवरे यांचा टॉसवर पराभव करून विजय मिळविला होता.व २००१साली झालेल्या पराभवाचे उट्टे काढले होते.
२०११मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या पॅनल मधून निवडणूक लढवून काँग्रेस, भाजपा यांच्याशी लढत देऊन पराभव पत्करावा लागला होता.
पुन्हा २०१६साली आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या भाजपा मधून काँग्रेसचे व्ही.डी. वाघमोडे यांचा पराभव करून पुन्हा नगरसेवक पदावर विराजमान झाले.तीन वेळा नगरसेवक पदावर विराजमान होऊन हॅट्रिक्ट साधली.
गेल्या २५वर्षांमध्ये त्यांनी पहल्यांदा जनता दलात माजी आमदार कॉ.माणिक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची सुरुवात केली. काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शहराध्यक्ष पद भूषविले तर२००१च्या न.प निवडणुकीत नगराध्यक्ष व २०११ साली झालेल्या नगर सेवक पदासाठीच्या निवडणुकीत असे २ वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला.
मात्र त्यांनी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच लढविली होती.राष्ट्रवादी काँग्रेचे नेते शरद पवार यांचा निकटचा संबंध होता. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ही त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.
मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या व काँग्रेस पक्षाच्या विरोधात सतत मोर्चे, लढे,आंदोलनात सहभागी होत असत.विशेष म्हणजे मातंग समाजाच्या म्हाडा झोपडपट्टीत चुकीच्या पद्धतीने घरे वाटपा बाबत त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते.
माजी आमदार आनंदमुनी शेषेरावजी वाघमारे व आर्य समाज संस्कारामुळे त्यांची जडण-घडण झाली.त्यांचे वडील नारायण कांबळे हे मात्र शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ऑड.श्रीपतराव साळुंके यांच्या पक्षासाठी काम केल्यामुळे शेकापच्या ताब्यात नगर पालिका असताना नारायण कांबळे यांना शिपाई पदावर नौकरी मिळाल्यामुळे परिवाराला आर्थिक आधार मिळाला. त्यामुळे हरिभाऊ कांबळे व परिवार यशाच्या शिखरावर पोहंचू शकले त्यांची प्रगती झाली.
आज त्यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे .या दुःखातुन त्यांच्या परिवाराला सावरण्याचे धैर्य मिळो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना.
त्यांच्या पार्थिवावर आज येथील मातंग स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाच वाजता अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात २ भाऊ,तीन बहिणी, पत्नी ,एक मुलगा एक मुलगी,पुतणे असा मोठा परिवार आहे.
मोहन क्षीरसागर ,निलंगा
मो 9421377707
Comments
Post a Comment