खरोसा बुद्ध लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष -भंते सुमेधजी नागसेन
खरोसा बुद्ध लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
-भंते सुमेधजी नागसेन
निलंगा,२१(मिलिंद कांबळे)
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे खरोसा येथील बुद्ध लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत समाज माध्यमांवर येथील भंते सुमेधजी नागसेन यांनी पोस्ट व्हायरल केली आहे की,खरोसा लेणी ही बौद्ध, मुस्लिम,हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान आहे.या लेणीला अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
मात्र या लेणीकडे पुरातत्व विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे येथे सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.
याबाबत पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष देऊन लेणीचा तात्काळ विकास करावा अशी मागणी येथील पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एकमेव सर्वात मोठी लेणी असलेलं ठिकाण म्हणजे खरोसा लेणी,खरोसा लेणीच्या सुरुवातीला बुद्ध लेणी आहे.
बुद्ध लेणी च्या परिसरात असलेला भव्य असा स्तूप पावसाने पूर्ण खराब होऊन नष्ट होत आहे पुरातत्व विभाग या कडे लक्ष देत नाही.
या लेणीला पर्यटन स्थळाचा 'ब' दर्जा मिळाला आहे.पर्यटन स्थळाचा 'ब' दर्जा असूनही खरोसा लेणी वर पायाभूत सुविधेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
खरोसा लेणीवर हिंदू, बौद्ध मुस्लिम, धार्मीय श्रद्धाळू अनुयायी दररोज लेणी च्या दर्शनासाठी गर्दी करतात.खरोसा लेणीकडे पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष देऊन खालील मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत त्यात खरोसा लेणीस पर्यटन स्थळा चा 'अ' दर्जा द्यावा,खरोसा लेणी च्या परिसरात उत्खनन करून मिळालेल्या ऐतिहासिक वस्तूंची देखभाल करावी, खरोसा लेणीच्या परिसरातील अनेक स्तूप, मंदिराची पडझड होत आहे.
सदर होत असलेली पडझड पुरातत्व विभागाने विषेश लक्ष देऊन थांबवावी,खरोसा लेणीला दर रविवारी अनेक पर्यटक निसर्ग अभ्यासक भेट देतात पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून लातूर ते खरोसा लेणी बस सेवा सुरू करावी.
खरोसा लेणी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, लेणी परिसरात बाथरूम ची व्यवस्था करावी, खरोसा लेणीचा परिसर स्वच्छ रहावा म्हणून पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
खरोसा लेणीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून लेणी परिसरात एक पोलिस चौकी ऊभी करावी , खरोसा लेणी परिसरात अनेक वन्य प्राणी राहतात त्यात मुख्यत्वे हरिन , काळवीट, ससा , मोर , सायाळ , वांनर व पशूपक्षी आहेत.
या सर्वाना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते , यांची भटकंती थांबावी पशुपक्षांसाठी लेणी परिसरात पाण्याची व्यवस्था करावी.
अश्या मागण्याही भंते सुमेधजी नागसेन यांनी केल्या आहेत.मागण्या मान्य नाही झाल्यास लॉकडॉऊन संपताच मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निलंगा/मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment