सावनगीरच्या शेतकऱ्यांनी चंदा जमा करून तयार केला रस्ता...
शेतकऱ्यांनी चंदा जमा करून तयार केला रस्ता
निलंगा,दि२१(मिलिंद कांबळे)
वारंवार लोकप्रतीनिधी व प्रसाशनाकडे अंबुलगा(बु) ते सावनगीरा हा रस्त्या करण्याची मागणी करूनही याकडे कोणीही सर्वांनी दुर्लक्ष केल्याने अखेर शेतकऱ्यांनी चक्क चंदा जमा करून रस्ता तयार केला आहे.
मौजे सावनगीरा ते अंबुलगा(बु)या दोन गावातील पाच किलोमिटरचे अंतर असून
या रस्त्याकडे आतापर्यंत येथील लोकप्रतिनिधी व सरकारचे नेहमीच दुर्लक्ष झाले.
याबाबत गावकऱ्यांनी अनेकवेळा मागणीही केली होती.परंतु अद्यापपर्यन्त यांबाबीकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे .
याबाबीला कंटाळून अखेर शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून चंदा जमा करून जमा झालेल्या रक्कमेतून रस्ता बनवला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सावनगीरा ते बंधर हा जवळपास अडीच किलोमीटर चा रस्ता आहे या रस्त्यावर आंबुलगा(बु) येथील रस्त्यावर पाणी साचून चिखल झाला होता.त्या भागातील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यास रहदारीस त्रास होत होता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी व काही गाववाल्याने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या व लोक सहभागातुन निधी जमा करून रस्ता तयार केला आहे.
हा रस्ता मेन रोड सावनगीरा ते बोटकुळ रोड बालाजी शेषराव सोळुंके यांच्या शेतापासुन ते माजी सरपंच अभिमान्यु सोळुंके यांच्या शेता पर्यन्त करण्यात आला आहे. या कामास बंधर रोडवरील शेतकरी बालाजी शेषराव सोळुंके, आंकुश सोळुंके, कुमार सोळुंके, आरविंद सोळुंके, राघोबा सोमवंशी,शरद सोमवंशी,विलास सोळुंके, तानाजी सोळुंके, बबन सोळुंके, अशोक सोळुंके, सुभाष विश्वनाथ सोळुंके, बासुमियॉ सय्यद,हमीद सय्यद,हबीब सयद,मकबुल सयद, मेहराज सयद,सिद्राम माधव सोळुंके,आभंग सोळुंके, हाणमंत सोळुंके, गोविंद वामन सोमवंशी, आभिमान्यु सोळुंके, जैनोदिन आरब, दत्ता आंगद सोळुंके, सुभाष आण्णाराव सोळुंके, बालाजी काळे,युवराज सोळुंके,विनोद जाधव, प्रकाश सोळुंके,बालाजी बाबाराव सोळुंके, सिद्राम सोळुंके,व सावनगीरा गावातील काही दानशुर नागरीकांनी त्या रस्त्याचा कसलाही संबध नसताना ग्राम पंचायत सदस्य युवराज जाधव,माजी सरपंच कमलाकर जाधव,कमलाकर सोमवंशी,पंडित जाधव,गणपत पाटिल,सोमेश्वर सोळुंके,रामदास सोमवंशी,पंढरी जाधव यांनी आर्थिक मदत केली.
याबद्दल गावकऱ्यांतुन सर्वांची अभिनंदन होत आहे.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment