लातूर जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट

लातूर जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट 

निलंगा,दि२९(मिलिंद कांबळे)

लातूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात  बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून याकडे प्रशानही गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र जिल्ह्यात  पहावयास मिळत आहे.

   दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगासमोर मोठे आव्हान उभे टाकले आहे.अश्या या कठीण प्रसंगात कोरोनावर मात करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र सरकार गेली चार महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

    त्यासाठी अनेक उपाय योजनांचा अवलंबही करीत आहे.त्यात प्रामुख्याने सुरुवातीला जनता कर्फ्यु ,थाळी नाद, लॉकडाऊन सारख्या पर्यायांचा अवलंब करण्यात आला. परंतु अद्यापही समाधानकारक यश भेटू  शकले नाही.

      म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री अमित देशमुख,व सर्वच लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला. अनेक निर्बंधासह अटी शर्थीसह जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी तो  जिल्ह्यात आमलात आणला.

 यात काही आस्थापने व अत्यावश्यक सेवेला वेगवेगळ्या वेळेत सूट देण्यात आली.त्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया ,प्रिंट मीडिया,डिजिटल मीडिया यांना वृत्तसंकलनासाठी सूट देण्यात आली आहे.परंतु लातूर जिल्ह्यात मात्र सूट देण्यात आलेल्या बाबीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होताना दिसत आहे.

 काही महाभाग स्वतःच्या स्वार्थासाठी बोगस ओळखपत्र तयार करून पत्रकार म्हणून खुलेआम फिरत असल्याचे चित्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.अनेक बोगस पत्रकार चारचाकी , दुचाकी इत्यादी वाहनावर प्रेस नाव टाकून खुलेआम फिरत आहेत.अश्या या बोगस पत्रकारामुळे खऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणत नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 अश्या बोगस पत्रकारांचा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासन शोध घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करतील का? हे त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे.अशी चर्चा पत्रकार बांधवांत मोठ्या प्रमाणात होत आहे.

निलंगा/मिलिंद कांबळे
मो 8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..