राजगृहावर हल्ला करणाऱ्या 'त्या'समाज कंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी
राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या 'त्या'समाजकंटकावर कठोर कारवाईची मागणी.
निलंगा : दि ०८(मिलिंद कांबळे)
भारतीय संविधान निर्माते, विश्वरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे निर्माण केलेल्या' राजगृहावर' ०७जुलै रोजी काही जातीयवादी समाज कंटकाकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ निलंग्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून त्या समाज कंटकाचा तात्काळ शोध घेऊन 'त्या' समाज कंटका विरोधात कायदेशीर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, जगभरातील आंबेडकरी जनतेची अस्मिता व स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे असलेल्या निवासस्थान 'राजगृहावर काल संध्याकाळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन राजगृहाची तोडफोड व नासधूस केली .या घटनेचे तिव्र पडसाद देशभर उमटत असून सर्वत्र या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनता पुढे येत आहे.
निलंगा तालुक्यातही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन अनेकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी , निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
निवेदनात हल्लेखोर,माथेफिरू वर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.कारवाई नाही केल्यास महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,सुनील सूर्यवंशी,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी,विधिज्ञ बालाजी धैर्य,.सुलक्षण धैर्य,अर्जुन कटके,गोविंद कांबळे(व्यापारी),
बालाजी कांबळे, अंकुश गायकवाड,दयानंद काळे,जेष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निलंगा /मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment