धक्कादायक : निलंगा शहरात आढळले १६ कोरोनाबाधित
धक्कादायक : निलंगा शहरात आढळले 15 कोरोना पाॅझिटिव्ह
निलंगा ,दि ०६ (मिलिंद कांबळे) काही दिवस एकही पेशंट नसलेल्या निलंगा तालुक्यात अचानक पंधरा रुग्णांची भर पडली आहे. शहरातील एका व्यावसायिकांच्या संपर्कात आलेले हे सर्व रुग्ण असून सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये काही लहान बालकांचा समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग सुरु असताना हरियाणाहुन आंध्रप्रदेश अशा प्रवासात असलेले आठ कोरोना बाधित रुग्ण निलंगा येथे आढळून आले आणि जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव झाला, त्यांनतर निलंगा शहरच नव्हे तर तालुक्यातील सर्वच गावातील लोकांनी खबरदारी घेत याचा सामना केला. आणि यावर मात केली, यानंतर क्वचित असे बाहेरगावाहून आलेले पेशंट तालुक्यात आढळले.उपचारानंतर काही दिवस तरी निलंगा तालुक्यात रुग्ण नाहीत याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते परंतु दोन दिवसाखाली शहरातील एका व्यापाऱ्यास कोरोनाची लागण झाली, त्यांनतर त्यांच्या संपर्कातील जवळपास पन्नास लोकांची तपासणी केली असता त्यातील पंधरा लोकांना बाधा झाल्याचे दिसून आले. त्यात परवा इंदिरा चौकात आढळलेल्या बाधिताच्या संपर्कातील 13 जणांचा तर दादापीर व दत्तनगरातील प्रत्येकी 1 अशा 15 जणांचा समावेश असून निलंग्यातील बाधितांची एकूण संख्या 16 झाली आहे.यामध्ये काही लहान बालक असल्याचे बोलले जात आहे, सदर वृत्तामुळे निलंगासह संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
निलंगा: मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment