वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यास घातला घेराव
वंचितच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा कृषि अधिकाऱ्यास घेराव
निलंगा , दि ०७(मिलिंद कांबळे)
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत व विविध मागण्यांसाठी निलंगा येथील तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या नेतृत्वात घेराव घालून विविध अडचणी सोडविण्याची मागणी करण्यात आली.
यावर्षी मराठवाड्यातील लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात पाऊस कमी झाला आहे.पाऊस पडला तोही उशिराने पडला आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक उगवलेच नाही.त्यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे व सुलतानी संकट उभे टाकले आहे.व कृषी कार्यालयाकडुन शेतकऱ्यांची होत असलेली परवड,व होत असलेली अडवणूक आज निलंग्यात पहावयास मिळाली.सोयाबीनचे पीक न उगवल्याने शेतकरी तक्रारी अर्ज कृषी अधिकारी कार्यालयात घेऊन आले परंतु अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला.याबाबतची कुणकुण वंचितच्या युवराज जोगी यांना लागतताच त्यांनी कृषी कार्यालय गाठले व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांनी अडचणींचा व पाढा वाचला. तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अनेक शेतकरी निघून गेले व काही थांबले.
तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी नेते युवराज जोगी यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात आंदोलन केले. वंचितचे नेते युवराज जोगी यांनी लातूर जिल्हा कृषी अधिकारी गवसाने यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलून शेतकऱ्यांचे सोयाबीन न वापलेले तक्रारी अर्ज घेण्यास सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना अर्ज घेण्यास सांगितले. तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यात आले.तसेच न उगवलेल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जानुसार शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यासाठी शंभर शेतकऱ्यांसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात तज्ञ लोकांचा सहभाग असला पाहिजे असा नियम असताना तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे गावातील कृषी सहाय्यक एकटाच करत आहे. ते सर्वस्व चुकीचे आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यास अडचण निर्माण होईल. त्यासाठी पंचनामे करण्यास नियमाप्रमाणे सर्व सदस्य घेऊन पंचनामे करावेत व एकाही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये. कृषी कार्यालय यात दिरंगाई करत आहे. त्यांनी शेतकरी हितासाठी अतिशय गंभीरपणे व नियमाप्रमाणे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी नेते युवराज जोगी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांसह केली आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली की,जिल्हा कृषी अधिकारी यांनी भ्रमणध्वनीवर संदेश पाठवला आहे की सोयाबीन न वापलेले अर्ज आज दि 7 रोजी दाखल करून घेऊ नयेत.तारीख संपलेली आहे. शेतकऱ्यांच्या विनंतीवरून जिल्हा कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार आज अर्ज दाखल करून घेत आहे. परंतु उदया दि 8 पासून अर्ज दाखल करून घेतले जाणार नाहीत.पंचनाम्यासाठी आम्हाला शंभर शेतकऱ्यांसाठी एक समिती नेमण्याचा जी आर आलेला नाही आमची समिती आहे, आम्ही पंचनामे करत आहोत आणि क्रॉस तपासणी केली जात असल्याचे माहिती याप्रसंगी कृषी अधिकारी नाबदे यांनी सांगितले.
यावेळी तुकाराम अर्धवाडे,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी,संपादक मोहन क्षीरसागर, पत्रकार मिलिंद कांबळे, गुरुनाथ मोहोळकर यांच्यासह शेतकरी शिंदे माधव व्यंकटराव गुंडेराव बाबूराव रेड्डी हंगारगा सूर्यवंशी सोपान मुगाव, मंगलबाई पवार जामगा,बालाजी पाटील बोरसुरी, राम बारमदे हसोरी, माधव पाटील चांदोरीवाडी,माधव उकळे निटूर, व्यंकट सूर्यवंशी हनमंतवाडी, प्रदीप पाटील मुदगड,गोविंद ढगे चिंचोली भंगार ,गोपीनाथ गायकवाड जामगा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.
निलंगा : मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment