निलंगा तालुक्यातील तरुणाचा हडपसर येथे खून

निलंगा तालुक्यातील तरुणाचा हडपसर येथे खून

निलंगा,दि ०९(मिलिंद कांबळे)

गावात रोजगार मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात गाव सोडून हडपसर पुणे येथे गेलेल्या २५ वर्षीय बौद्ध युवकाचा खून केल्याची घटना परवा घडली.
      निलंगा तालुक्यातील मौजे हालसी(तुगाव)ता निलंगा जिल्हा लातूर येथील आकाश लक्ष्मण भोसले हा २४ वर्षीय तरुण आपल्या आई वडीलांसह हडपसर येथे तीन वर्षांपासून रहात असत  तो अमीर चिकन प्रायव्हेट कंपनीत कामाला होता.नेहमी प्रमाणे आकाश हा चिकनच्या दुकानातील रोकड गोळा करीत असताना
साडे सतरा नळी चौकामध्ये रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली ,हडपसर परिसरात पुन्हा खुनाचा  प्रकार  घडल्याने  भीतीचे वातावरण पसरले आहे,या प्रकरणी हडपसर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मुख आरोपीला  गजाआड केले, आकाश लक्ष्मण भोसले (वय24काळेपडल हडपसर)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे लहू बन्सी शिंदे(वय22 भिमाले हायट्स हडपसर) असे आरोपीचे नाव आहे ,अमीर कंपनीचे संचालक रविंद्र जगन्नाथ  भोसले (वय 50 रा हंडेवाडी रोड हडपसर यांनी फिर्याद दिली  पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे  यांनी दिलेल्या माहितीनुसार  मृत आकाश  भोसले  हा अमीर  चिकन प्रायव्हेट  लिमिटेड  कंपनीत कामाला   आहे, तो हडपसर परिसरामध्ये चिकनच्या दुकानात मधून रोकड  जमा करत होता , आरोपी लहू शिंदे व मृत आकाश भोसले  दोघे एकाच  रुम मध्ये राहत होते त्यामुळे त्यांची  चांगली मैत्री होती ,दुपारी तीनच्या सुमारास आकाश   साडे सतरा  नळी येथे चिकनच्या दुकानातून रोकड घ्यायला आला होता , आकाश कडे रविवारी धंदा झालेल्या दुकानाची  चार लाख रुपयांची रोकड होती,  त्याच्याकडे  लाखो  रुपये  असल्याची शिंदेला  माहिती होती ,पैशाची गरज  असल्याने शिंदेंनी आकाश ला पैसे मागितले मात्र कंपनीची रोकड  देऊ शकत नसल्यामुळे  आकाश सांगताच   दोघामध्ये  वाद झाला  तेव्हा  आरोपीने  दुकानातील  चिकनचे तुकडे करणाऱ्या  हत्याराने  आकाशच्या डोक्यात व गळ्यावर वार केले त्यामुळे आकाश रक्ताच्या  थारोळ्यात कोसळला , हडपसर पोलिसांनी दोन तासांत संशयीत  आरोपीला  ताब्यात घेतले ,उपायुक्त  सुहास बावचे साह्ययक पोलीस आयुक्त कल्याण विधाते  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश  साठे , पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी केली

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..