सौ गवळी एल आर मॅडम सेवसनिवृत्त
महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर निलंगा या शाळेतील शिक्षिका सौ गवळी एल आर या ३९वर्षे पाच महिने सेवा करून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या.
या शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाठक सर मुख्याध्यापक झरकर सर मुख्याध्यापक ढगे सर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सौ गवळी मॅडमच्या कार्याचा थोडक्यात परिचय मिरगुडे सरांनी केला त्यानी आपल्या भाषणात सांगितले की गवळी मॅडम याना निलंगा तालुका व लातूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्काराच्या मानकरी आहेत.त्या 39 वर्षे पाच महिने इयत्ता पहिली वर्गावर कार्यरत होत्या. मॅडम स्वतःचे मनोगत व्यक्त करण्याआधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर तथा आदरणीय दादासाहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मनोगतास सुरुवात केल्या त्यांची यशस्वी सेवा पार पडण्यामागे परिवारातील त्यांची आई पती व मुली मुले यांचे योगदान आहे असे म्हणाल्या तसेच सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक यांचे पण सेवा काळातील सहकार्याबद्दल आभार व्यक्त केल्या.
सौ गवळी मॅडम यांच्याबद्दल झरकर सर नाईकवाडे मॅडम मरगणे मॅडम पाटील मॅडम पटवारी मॅडम इनामदार मॅडम पवळे सर यांनी त्यांच्या कार्याबाबत थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक पाठकसर यांनी त्यांच्या अध्यक्षीय
भाषणात आम्हाला त्यांची कमी भासेल असे गौरव उद्गार काढले तसेच त्यांचे कार्य उत्कृष्ट होते असे म्हणाले. शेवटी मलीले सरांनी सर्व उपस्थित उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment