निलंग्यात लोकलढा समितीचा आक्रोश

निलंग्यात लोकलढा समितीचा आक्रोश

विविध मागण्यासाठी मुख्यमंत्र्याना  निवेदन


निलंगा,०३(मिलिंद कांबळे)

दिवसेंदिवस वाढत चाललेला लॉकडॉऊन, दिवसेंदिवस वाढत चाललेली पोलीस प्रशासनाची  गुंडागर्दी, दिवसेंदिवस शासनाकडून मोफत देण्यात येत असलेले धान्य देण्यास होत असलेली टाळाटाळ ,गोरगरीब जनतेला मिळत नसलेला रोजगार, छोटे व्यापारी यांचा बंद असलेला व्यापार, वेळेत पाऊस पडत नसल्याने चिंतातुर शेतकरी,वाढत चाललेले वीजबिल,वाढत चाललेली बेरोजगारी,निराधारांचे थांबलेले अनुदान,कोविड सेंटर मध्ये होत असलेली रुग्णाची गैरसोय,आरोग्य विभागाकडून सायरन वाजवून निर्माण करीत असलेली दहशत या व अनेक समस्याची सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी आज निलंग्यात लोकलढा समितीच्या माध्यमातून विविध पक्ष संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्याने उप-विभागीय अधिकारी विकास माने यांच्या समोर आपला तीव्र शब्दात  आक्रोश व्यक्त करून  विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिवसेंदिवस शहरात व तालुक्यात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याबाबत येथील जागृत नागरिकांच्या वतीने अनेक विषयांवर अनेक पदाधिकारी यांच्यात भ्रमण ध्वनीद्वारे विचारविनिमय झाला.व जनतेत वाढत चाललेल्या अनेक बाबींचाआक्रोश शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी  आज १२:०० वाजता विविध मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले होते

ठरल्याप्रमाणे आज दि ०३ ऑगस्ट रोजी दुपारी १२:००वा वाजता उपविभागीय अधिकारी  कार्यालयाच्या प्रांगणात शारीरीक अंतर ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व  लोकांना होत असलेल्या त्रासाबाबतचा आक्रोश उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या समोर व्यक्त केला.

 यात प्रामुख्याने पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत अनेकांनी आपला आक्रोश व्यक्त केला.येथे पोलिसांकडून अमानुष मारहाण झालेल्या पीडितांनाही समक्ष आणून शरीरावर झालेल्या जखमा साहेबांना दाखवण्यात आल्या.जखमा पाहून उपविभागीय अधिकारी विकास माने साहेब निशब्द झाले.

 यावेळी अनेकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंदी व्यक्त केली.एका सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला व  सांगितले की,निलंगा पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी कसलेही वारंट नसतांना घरात घुसून मारहाण करून गांज्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.

दिलेल्या निवेदनात खालील प्रमाणे प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.त्यात निलंगा शहरातील छोटे व्यापारी,पान टपऱ्या,हेअर सलून,हातगाड़े,अश्या छोटे व्यवसायिकांना ही शासनाने ठरवलेल्या निर्धारित वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, लॉकडाऊनच्या काळातील सर्व विज बिल  माफ करण्यात यावे,मनरेगा योजने अंतर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना विशेष अनुदान देण्यात यावे.कोव्हीड सेंटर मध्ये असलेल्या कोरोना बाधित रुग्णाची होत असलेली गैरसोय तात्काळ दूर करून शासनाच्या सर्व सोयी उपलब्ध करून उपचार करण्यात यावा.

शहरासह तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून  होत असलेला धान्याचा काळा बाजार थांबविण्यात यावा

निलंगा मतदारसंघातील पत्रकारावर जाणून बुजुन मागच्या बातमीच्या राग मनात ठेवून पोलिसांकडून मारहाण,शिविगाळीचे प्रकार वाढत चालले आहेत.
निलंगा शहरातील पोलिस सत्य लपवून चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.हे कृत्य निंदनीय असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय तात्काळ चौकाशी करून कड़क करवाई करण्यात यावी.

नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात यावी.शहरातील कामानिमित्त घराच्या बाहेर पडणाऱ्या शासकीय कर्मचारी,सामान्य नागरिक,भाजीपाला हातगाडे, वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना रस्त्यावर भर चौकात शिविगाळ करून अपमानित करणाऱ्या पोलिसांची गुंडागर्दी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

शासनाच्या नियमाप्रमाणे कोव्हीड 19 सेंटर शहराच्या बाहेर करण्यात यावे.
त्याचप्रमाणे येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोव्हीड 19 च्या नियमानुसार शारीरक अंतर ठेवत ध्वजारोहण करण्याची नागरिकांना परवानगी देण्यात यावी अश्या विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे दयानंद चोपणे,रिपाईडेचे विलास सुर्यवंशी,शेकापचे ऍड.नारायण सोमवंशी,शिवसेनेचे जेष्ठ नेते विनोदजी आर्य,भारतीय बौद्ध महासभेचे प्रा.रोहित बनसोडे,ओबीसी सेवा संघाचे मोहन क्षीरसागर, भटके-विमुक्त संघटनेचे विलास माने,राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ,वंचित बहुजन आघाडीचे युवराज जोगी,शिवसेनेचे ईश्वर पाटील,गणराज्य संघाचे रामलिंग पटसाळगे,टिपू सुलतान संघटनेचे मुजीब सौदागर,ढोर ककय्या संघटनेचे,अर्जुनअप्पा कटके,भीम शक्तीचे दिगंबर सूर्यवंशी(नणंदकर) युवा सेनेचे दत्ता मोहोळकर, वंचित चे देवदत्त सूर्यवंशी माजी नगरसेवक दादाराव जाधव,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी,काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अजगर अन्सारी,काँग्रेसचे सरचिटणीस अमोल सोनकांबळे,भटक्या विमुक्त संघटनेचे उत्तम माने, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर बागवान,सामाजिक कार्यकर्ते ईस्माईल बागवान, शेख मुस्तपा,यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


(लॉकडॉऊन च्या काळात निलंगा पोलिस प्रशासनाकडून  शहरात व तालुक्यात निर्माण केलेली दहशत व आराजकता याबाबत शिवसेनेचे नेते विनोद आर्य व लोकलढा समितीचे सदस्य  मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे  सबळ पुरावे सादर करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार.)

विनोद आर्य जेष्ठ शिवसेना नेते लातूर जिल्हा)


मिलिंद कांबळे, निलंगा
मो 9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..