भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे नामकरण...

स्वातंत्र्य दिनी डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम चौकाचे नामकरण

निलंगा दि,१५(मिलिंद कांबळे)

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केळगाव ता निलंगा जिल्हा लातूर येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम चौकाचे नामकरण करण्यात आले.

गावातील मुख्य चौकाला माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम चौक असे नाव देण्याची अनेक वर्षपासूनची गावकऱ्यांची मागणी होती. ती आज पूर्ण झाली आहे.काँग्रेसचे युवा नेते अभयदादा साळुंके यांच्या हस्ते आज सकाळी चौकाचे नामकरण करण्यात आले.

महापुरुषांचा आदर्श भावी पिढीने घ्यावा व आपले  सामाजिक जीवन प्रतिभासंपन्न कारावे.डॉ कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्यासारखे कार्य आपल्याही हातून घडावे  या हेतूने ह्या नवीन चौकाचा नामकरण सोहळा करण्यात आला आहे.
 
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या भारत देशाला आनुशस्त्राचा शोध लावून देऊन ,जगात भारताची मान अभिमानाने उंचावून भारत देशाचे राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या डॉ अब्दुल कलाम हे महापुरुष भारतासह संपूर्ण जगात सदैव अमर आहेत. व राहतील असे मत अभयदादा साळुंके यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापक्याचे माजी सरपंच शकील पटेल,राठोडा गावचे कुमार राजे,केळगावचे माजी सरपंच शकील पांढरे,समद पांढरे,बाबुराव राठोड,रावण कांबळे,फारूक पांढरे,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कांबळे,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवाजी चव्हाण,मधुकर चव्हाण,बालाजी पाटील, सुधाकर चव्हाण,रामेश्वर गवारे,अंगद काळे,दशरथ कांबळे,गोपाळ राठोडकर,जावेद मुजावर(पत्रकार)     ,ग्रामपंचायत लिपिक अहेमद शेख,बालाजी पेठकर,शिवाजी कांबळे,सत्यवान सूर्यवंशी सह गावकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


 यावेळी सर्वांनी ए पी जे अब्दुल कलाम जिंदाबाद अश्याया घोषणा देऊन  आनंद व्यक्त केला.


Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..