बळीराजा चिंताग्रस्त :सोयाबीनने टाकल्या माना..
- Get link
- X
- Other Apps
बळीराजा चिंताग्रस्त : निलंगा-शिरूरअनंतपाळ-देवणी तालुक्यात पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या
निलंगा,दि१०(मिलिंद कांबळे)
निलंगा उपविभागात येणाऱ्या निलंगा,देवणी,शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने २५ दिवसांपासून दडी मारल्याने ऐन फुलोऱ्यात व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेली सोयाबीन पिकासह इतर खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
उपविभागातील सर्वच तालुक्यातील पाणी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झालेला नाही.गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.
फुलोऱ्यातील सोयाबीन व मुग या पिकांना पावसाची नितांत गरज आहे.एक-दोन दिवसात दमदार पाऊस न आल्यास शेती उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपविभागात दमदार पाऊस न झाल्याने प्रकल्पातील जलसाठा किंचीतही वाढलेला नाही. खरीपातील पिके वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे.हवामान विभागाने चांगला आणि वेळेवर पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
निलंगा/मिलिंद कांबळे
मो 8626000526
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment