उदगीर तहसील कार्यालया समोर अपंगांचे आमरण उपोषण
विविध मागण्यांसाठी हंडरगुळी येथिल अपंगांचे उपोषण सुरू
निलंगा,दि१३(मिलिंद कांबळे)
हंडरगुळी ता उदगीर जिल्हा लातूर येथील अपंग व्यक्तींचे उदगीर तहसील कार्यालयासमोर
ग्रामपंचायतीकडून अपंगाना निधी मिळावा यासाठी बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
हंडरगुळी येथील ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून दिव्यांगांवर अद्याप कसलाही निधी खर्च केला नसल्याचे अपंगांचे म्हणणे आहे.
सदर चा निधी अपंगांना मिळावा यासाठी मागील आठवड्यात प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते.
या निधीचा ग्रापंचायतीच्या अधिकाऱ्याने परस्पर खर्च केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.प्रशासनाने याची दखल न घेतल्याने १२आँगस्ट २०२० बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.चौदाव्या वित्त आयोगातून अपंग व्यक्तींना हंडरगुळी ग्रामपंचायतीकडून तात्काळ निधी वाटप करावा, अपंगांचा निधी हडप करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे आदी मागण्या आहेत.
Comments
Post a Comment