निलंगा तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने निलंगेकरांना श्रद्धांजली
निलंगा तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने डॉ निलंगेकरांना श्रद्धांजली
निलंगा/प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे जिल्हाभर दुःखा चे सावट पसरले आहे.
निलंगेकर यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.या दुःखात निलंगा तालुका ग्रंथालय संघ सहभागी आहे.
निलंगा तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ अनंतराव सबनीस ,जेष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर,उपस्थित होते.यावेळी प्राध्यापक आर व्ही मोरे यांनी निलंगेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन सौदागर यांनी केले याप्रसंगी सूर्यकांत सुरवसे,गुप्तलिंग स्वामी,विवेकानंद बिराजदार ,सुधाकर वाडीकर,इब्राहिम फारुकी,तानाजी काळे,पटेल मूस्ताक यांचेसह अनेक ग्रंथपाल व ग्रंथालययाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment