शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरीच सर्जा राजाचा सन्मान

शिरूरअनंतपाळ तालुक्यात
कोरोनामुळे घरीच सर्जा राजाचा सन्मान...
ओमप्रकाश तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : कोरोनामुळे बळिराजाचा महत्त्वाचा असलेला पोळा हा सण घरीच साजरा करावा लागला असल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते .भारतीय संस्कृतीत पोळा हा शेतकर्‍यांकरिता महत्त्वाच्या सणांपैकी एक मानल्या जातो. या सणाच्या निमित्ताने बळिराजा वर्षभर आपल्या सोबत उन्हातान्हात थंडी पावसात राबराबणार्‍या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, कोरोना महामारी मुळे शेतकर्‍यांना आपल्या सर्जा राज्याज्या सार्वजनिक ठिकाणी न नेता घरीच पुरणपोळीचा नवैद्य खाऊ घालावा  लागल्याने  शेतकर्‍यांची कुंटुंबीयाची पोळा सणा बद्दल असलेल्या उस्तूकतेची हिरमोड झाली आहे.
  शेतकरी कितीही आर्थिक अडचणीत असो वा संकटात मात्र तो हा सण फक्त आणि फक्त आपल्या सर्जाराजा या मित्राची कृतज्ञता बाळगत उत्साहात साजरा करण्याची ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू असुन हा सण शेतकर्‍यांना घरीच साजरा करावा लागला असला तरी देखील कोरोनामुळे पोळा सण सार्वजनिक ठिकाणी भरविता येणार नसला तरी कितीही मोठे संकट आले तरी शेतकर्‍यानी आपल्या ढवळ्या पवळ्याला घरीच सजवून त्यांच्या सन्मानात कुठेही कमतरता भासू दिली  नाही हे मात्र तितकेच खरे आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..