मागासवर्गीयांचा नोकर भरतीतील रिक्त अनुशेष तात्काळ भरण्याची मागणी
मागासवर्गीयांचा नोकर भरतीतील रिक्त अनुशेष तात्काळ भरण्याची मागणी
निलंगा,दि२०(मिलिंद कांबळे)
मागासवर्गीय समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी,त्यामुळे लाखो सुशिक्षित उच्य शिक्षीत लोक बेरोजगार झाले आहेत.त्यामुळे या वर्गात मोठ्या प्रमाणात नैराश्य निर्माण झाले आहे.त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी तात्काळ थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांचा नोकर भरतीत रिक्त असलेला अनुशेष व पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ भरण्याची मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा लातूर च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,भारतीय राज्यघटनेतील कलम 16 4(4क) नुसार कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मधील आरक्षण सुरू ठेवण्याची तरतूद आहे.परंतु फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली होती.याबाबत न्यायालयात न्याय मागीतला असता न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे निर्देश दिले आहेत.
याबाबत देशातील अनेक राज्यांनी या आदेशाची अंमल बजावणी केली आहे.परंतु महाराष्ट्र सरकार याबाबत टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्त कास्टट्राई कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालया
समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, मुख्य सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये 10% आर्थिक निकषावर सवर्ण आरक्षणाची अमंलबजावणी सुरू आहे. एस.ई.बी.सि. संवर्गातून मराठा समाजासाठी आरक्षणाची अमंलबजावणी सुरू आहे.परंतु अनुसुचित जाती,जमाती,भटक्या जाती- जमाती,यांचे सेवयोजनेतील प्रमाण अत्यल्प असले तरी अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती मधील आरक्षण स्थगित केले आहे.
भारतीय घटनेतील कलम 16 4(4क) नुसार असे नमूद केले आहे की, ज्या राज्यामध्ये सेवयोजनेमध्ये ज्या संवर्गाचे प्रमाण कमी आहे त्या संवर्गातील पदोन्नती मध्ये आरक्षण देऊन त्यांना संधी उपलब्द करण्यासाठीचा अधिकार प्रत्येक राज्यास आहे.
असे सर्वोच्च न्यायालयानेही निर्देशित केले आहे परंतु न्यायालयात याचिका दाखल आहे या नावाखाली पदोन्नतीतील आरक्षण फडणवीस सरकारने स्थगित केले आहे.
महाराष्ट्र राज्यात यापूर्वी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतांना शिंदे सरकारने एकूण दिड लाखाचा मागासवर्गीचा अनुशेष भरला होता.आज महाराष्ट्र राज्यात दोन लाखाचा विविध क्षेत्रामध्ये/ खात्यामध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष शिल्लक असूनही महाराष्ट्र सरकार अनुशेष भरत नाही.
दोन्ही बाजूने मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पदोन्नती मध्ये आरक्षण व बिंदू नामावली नुसार अनुशेष तात्काळ भरावा अशी मागणी काट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ लातूर च्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर महासंघाचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांच्यासह किशोर गायकवाड, डॉ. विलास गाजरे , बळीराम गायकवाड ,अरविंद भोसले, रवी कुरील, बाबुराव बनसोडे ,विद्यासागर काळे, बाबुराव जाधव, रमेश मांदळे बालाजी सूर्यवंशी, आर पी. ढगे, आर .पी. हिंगे, इत्यादिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निलंगा/ मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment