येरोळ येथे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली.

येरोळ येथे मा. मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना श्रध्दांजली

शिरूर अनंतपाळ /प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, हैदराबाद मुक्ती लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे कणखर, संघर्षशील, चारित्र्यसंपन्न लोकप्रिय नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात येरोळ येथील सरपंच अतुल पाटील गंभीरे 
यांनी येरोळ येथील वि.का.सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले आहे.

    येथील श्रध्दांजली कार्यक्रमात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब व येरोळ येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील यांचे नुकत्तेच अकाली निधन झाले . त्यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा व श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात येवुन त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दोन मिनिट मौन पाळण्यात आले व पुष्प वाहुन श्रध्दांजली वहाण्यात आली . यावेळी येरोळ येथील सरपंच अतुल पाटील , डिगोळ सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील , सुमठाणा येथील सरपंच लक्ष्मण बिरादार , मैन्नोदिन मुजेवार , दैठणा येथील सरपंच योगेश बिरादार , जहरुद्दीन शेख , आमर माडजे , औमप्रकाश तांबोळकर , रविकिरण पाटील, पुंडलिक म्हाके , बाबुराव वाघमारे , विश्वनाथ गंभीरे , नवाझ पठाण , बालाजी भालेकर , गणेश उमामोड , श्रीधर शिंदे , नवनाथ गीरी यांच्यासह येरोळ व परिसरातील चेअरमन , सरपंच नागरिक उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..