पारतंत्र्य

पारतंत्र्य  ..

स्वतंत्र  झालो तरी
राहिलोसे जखडून 
जुन्या रूढी परंपरा
ठेवलेल्या  पकडून 

अंध श्रध्दा शृंखला 
जाती सारे बिघडून 
बंद   केले  दरवाजे
पाही कोण उघडून

कायदेअसे नावाला
खटले तसेचं  पडून 
आम्ही संपून जातो
आपापसात  लढून 

सोंग घेतले  झोपेचे
खोटी चादर ओढून
पळत्याचे पळे मागे 
हातचे सुख  सोडून 

संगीतखुर्ची खेळात 
गेलो  कसले  गढून 
स्वातंत्र्य मिळे  तरी
ठेवी स्वता जखडून 

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996.
www.kavyakusum.com

2
स्वातंत्र्यदिन ..

स्वातंत्र्यदिन आला
झेंडेबाजार फुलला 
एवढे  सुंदर ते झेंडे 
प्रत्येकजण भुलला

कुणी लावे गाडीला
कुणी शर्टा साडीला
झेंडे  हवेत  सर्वांना
कुणा गच्चीमाडीला

भाव  येई  झेंड्याला
उमाळा देश  प्रेमाला
झेंड्यासहीत सेल्फी 
जो तो जुडे कामाला

जिकडे  तिकडे झेंडे 
बरे  वाटते  पहायला
हरेकजण आसुसला
देशभक्तीत नहायला

दुस-या  दिवशी झेंडे 
नको  कुठे पडायला
झेंडे  नाहीत  कचरा 
हवे डोळे उघडायला

-- हेमंत मुसरीफ पुणे
   9730306996..
www.kavyakusum.com
3)

स्वातंत्र्यसंग्राम ..

आम्ही नव्हतो तेव्हा 
स्वातंत्र्य    संग्रामात
मोकळा श्वास आता
असा घेतो आरामात

इतिहास   वाचताना 
शिरतो त्या  काळात
जाणवतो  थरार  तो
धगधगत्या ज्वाळात

बलीदान शहीदांचे ते
सळसळत्या  रक्तात
दिसती असंख्य हात
अशा  स्वतंत्र तक्तात 

शहीदां  न  मोजदात
ज्ञात  अनेक  अज्ञात
आहुती  पडत  होती
स्वातंत्र्याच्या  यज्ञात

संसार  राख रांगोळी
कुटूंबाची   वाताहात 
एकत्र जुडलेले  हात
विसरूनि  धर्म  जात

सक्षम तिरंगा दिधला
हा  आपल्या  हातात
जबाबदारी ना  सोपी 
असावे  कळावे  ज्ञात

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996.
www.kavyakusum.com

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..