वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश ,अनेक गावांमध्ये बससेवा सुरू

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश

अनेक गावांमध्ये बससेवा सुरू आगमन

निलंगा,दि२६(मिलिंद कांबळे)

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली बस सेवा पूर्वरत चालू करण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश प्राप्त झाले असून दि.२६ वार बुधवारी निलंगा आगारातून निलंगा कासारसिरसी व्हाया मदनसुरी,हाडोळी,अंबुलगा (वि),रामलिंग मुदगड,मार्गे कासारसिरसी जाणारी तब्बल सहा महिन्यानंतर बस  पूर्ववत सुरूवात  करण्यात आली आहे.

बससेवा बंद असल्यामुळे अनेक गोरगरीब जनतेची हाल-अपेष्टा होत होती  त्यांना इतर ठिकाणी चालत जावे जावे लागत होते. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन  देण्यात आलं होतं.या निवेदनाची दाखल घेत आगार प्रमुख युवराज थडकर यांनी  दि २६ऑगस्ट २०२० रोजी    निलंगा आगारातुन बससेवा सुरळीत सुरू केली.

याबाबतची माहिती मिळताच वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांनी व मौजे रामलिंग मुदगड येथिल गावकऱ्यांच्या वतीने बसचे गावात आगमन होताच बसचे व बसच्या चालक वाहकाचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,भरत गायकवाड,दस्तगीर शेख,व्यंकट शिंगे, व्यंकट गड्डे,बसवराज कांबळे, बालाजी कांबळे, देविदास भुते, प्रेमनाथ गायकवाड, लक्ष्मण कांबळे, सोमा कांबळे, पैलवान श्रीकांत कांबळे, अंगद भुते, प्रकाश गायकवाड,यांच्यासह रामलिंग मुदगड येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

निलंगा/मिलिंद कांबळे
मो 9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..