नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू
निलंगा,दि२७(मिलिंद कांबळे)
मौजे रामलिंग मुदगड ता निलंगा जिल्हा लातूर येथील १९वर्षीय तरुणांचा पाण्याच्या नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना काल दि २६रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.यामुळे गाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी इयत्ता १२ वी ची परीक्षा पास झालेला सादिक उर्फ़ इमाम महोद्दीन शेख हा कदमापुर शिवारात आपल्या स्वतःच्या शेतात सोयाबीन पिकावर किटकनाशक फवारणी करण्यासाठी गेला होता.
दिवसभर फवारणी करून फवारणी चे काम संपल्यानंतर सायंकाळी ०५वा च्या सुमारास तो व त्याचा लहान भाऊ हात,पाय धुण्यासाठी शेता शेजारील नाल्याकडे गेले होते.
पाय धुत असतांना त्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला लहान भावाने आरडाओरड केला परंतु लोक येईपर्यंत व त्याला पोहता येत नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्याच्या पार्थिवावर कासारसिरसी येथील सरकारी दवाखान्यात उत्तरीय करण्यात आली.
Comments
Post a Comment