निलंगा उपविभागात मोफतचे तांदूळ,गहू , चना डाळ वाटप करण्याची मागणी..
निलंगा उपविभागात मोफतचे तांदूळ ,गहू ,वाटप करण्याची मागणी
निलंगा,दि ०६ (मिलिंद कांबळे)
दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,वाढत चाललेला लॉकडॉऊन ,हातावर पोट असणाऱ्याच्या हाताला मिळत नसलेला रोजगार, त्यामुळे सामान्य जनतेची होत असलेली उपासमार व भूकबळी थांबविण्याच्या मागणीसाठी निलंगा उपविभागात तात्काळ मोफतचे धान्य वाटप करण्याची मागणी वंचित बहुजन आघडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निलंगा उपविभागात येणाऱ्या निलंगा,देवणी,शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील अनेक गावातील अनेक लोकांच्या स्वस्त धान्य वाटप नाही झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक गावात स्वस्त धान्य दुकानदार हे नियमित धान्य वाटपात शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यास्तीचे दर आकारणी करून जनतेची आर्थिक लूट करीत आहेत.
त्याच प्रमाणे मोफत धान्य वाटपाच्या योजनेत नियमाप्रमाणे धान्य वाटप न करता प्रत्येकी एका व्यक्तीच्या मागे एक ते दोन किलो धान्य कमी देत आहेत.
सामान्य नागरिकांनी विचारपूस केली असता स्वस्त धान्य दुकानदार उलट दमदाटी करीत आहेत.
अश्याही अनेक दुकानदाराच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यामुळे अनेक सामान्य जनतेची उपासमार होत आहे.
त्यामुळे आपल्या निलंगा उपविभागात तात्काळ जुलै महिन्याचे मोफतचे धान्य वाटप करावे अन्यथा भूकबळी जाण्याची शक्यता असल्याचे संकेत निवेदनाद्वारे देण्यात आले आहे .
जर एखाद्या गरीबांचा भूकबळी गेला तर त्यास सर्वस्व उपविभागीय अधिकारी,निलंगा जवाबदार असतील असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून तात्काळ कारवाई करून अहवाल देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप सोनकांबळे, देवदत्त सूर्यवंशी,अर्जुनाप्पा कटके,गोविंद व्यापारी, बालाजी कांबळे,भरत गायकवाड, पांडुरंग महाराज(वडगावकर) इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment