रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर
- Get link
- X
- Other Apps
रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर
निलंगा,दि१०(मिलिंद कांबळे)
ग्रामीण भागात पावसाळ्यात नैर्सगीक रानभाज्याचा वापर भाजी साठी होत असतो. मात्र पाऊस अनियमीत पडत असल्याने या रानभाज्या दूर्मिळ झाल्या आहेत.
ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला की अनेक कुंटुबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होतो.या रानभाज्या अनेकजन रानावनातुन आणुन बाजारात विक्री करित असतात.परंतु निर्सगाचा वेळेवर पाऊस पडत नसल्यामुळे या नैर्सगीक उगवणार्या रानभाज्या नष्ट होत असल्याने अनेकांचा रोजगारावर पाणी फिरले आहे.
कर्टुले, अंबाडीची भाजी, तरवठ्याची भाजी , दगडी शेपुची भाजी,पाथराची व घोळची या भाज्यांचा आहारात वापर केला जातो. या भाज्याच्या सेवनामुळे शरिरात असणारे अनेक रोग दुर होतात.शिवाय या भाज्या नैसर्गिकरित्या येत असल्याने त्यांना केवळ पावसाची गरज असते.
मात्र यंदा पावसाने विश्रांती घेतल्याने रानभाज्यांचे प्रमाण घटले आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तर अनेकांना या भाज्याच यावर्षी खाण्यास मिळाल्या नसल्याने अनेकजण नाराज आहेत.
निलंगा/मिलिंद कांबळे
मो 9960049411
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment