सोमलिंग विद्यालयाची सुषमा मिलगिरेचे यश

  सोमलिंग विद्यालयाची सुषमा मिलगीरेचे यश

निलंगा,दि०४(मिलिंद कांबळे)

 कासारसिरसी येथून जवळच असलेल्या कोराळी वाडीच्या सोमलींगेश्वर विद्यालयात  शिक्षण घेत असलेली सुषमा मिलगीरे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत येथील विद्यालयांमध्ये पहिले स्थान मिळविले आहे. 
        कोराळीवाडी हे गाव  निलंगा तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरचा शेवटचा टोक आहे.येथे विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या डिगंबर रावसाहेब मिलगिरे यांची कन्या  सुषमा डिगंबर मिलगीरे हिने शंभर पैकी 88 टक्के मार्कस आणि गणित या विषयांमध्ये शंभर पैकी 96 मार्कस मिळवून येथील सोमलिंग विद्यालयांमध्ये इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत  पहिला स्थान मिळून नाव उंचाविला आहे.
 ह्यामुळे ह्या विद्यार्थिनीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये येथील मुख्याध्यापिका एस. ए. देशमुख मॅडम, गावचे सरपंच कल्पना गायकवाड, उपसरपंच रावसाहेब आकडे, येथील शिक्षक एस.बी.हासुरे, ए. व्ही, स्वामी, एम. जी.जाधव. जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील, अन्य पदाधिकार्‍यांच्या वतीने व  तसेच पालक वर्गातून या मुलीचा अभिनंदन करून तिच्या  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..