ओ.बी.सी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी..
ओ.बी.सी.आरक्षणाची अंमल बजावणी करण्याची मागणी
निलंगा,दि०७ (मिलिंद कांबळे)
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला दिलेल्या हक्काच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा निलंगाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकार ओ बी सी आरक्षणाची अंमल बजावणी करीत नसल्याने लाखो विद्यार्थी मेडीकलच्या प्रवेशा पासून वंचित राहात असून त्यांचे प्रवेश होत नसल्याने प्रचंड नुकसान होत आहे.
नेट प्रवेश परिक्षेमध्ये ११ हजार ओबीसीसाठीच्या मेडीकलच्या जागा डावलण्यात आल्या तसेच ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पाचशे कोटीवरुन ३४ कोटी रूपयावर आणण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकिय आरक्षण डावलण्यात येत आहे.अशा प्रकारे देशात ५२ टक्के असलेल्या समुहाला लक्ष्य करुन त्यांना घटनेने बहाल केलेल्या शिक्षण ,नोकरी व राजकिय आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.
ओ बी सी समाजाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मंडल कमिशन नुसार २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आलेले होते.ते कायम ठेवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल कमिशन नुसार दिलेल्या हक्काच्या 27 टक्के आरक्षणाची उघडपणे पायमल्ली सुरू असून केंद्रातील मोदी सरकार ओबीसीच्या हक्काचे आरक्षण मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पूर्णपणे डावलेले आहे.असे उघडकीस आले आहे.
ऑल इंडिया फेडरेशन ऑफ आदर बॅकवर्ड क्लासेस कर्मचारी संघटनेने ओबीसी आरोग्य मंत्रालयाकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की 2017 पासून दहा हजारापेक्षा अधिक उमेदवारांनी पदवीधर व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारण्यात आले आहे.
या जागा अर्थातच खुल्या गटातील उच्चजातीय विद्यार्थ्यांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. केंद्रीय पातळीवरून अखिल भारतीय वैद्यकीय कॉन्सिल द्वारा देशात सर्व वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश देण्याची प्रक्रिया होती.
या प्रवेश प्रक्रियेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या वैद्यकीय संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण लागू न केल्याचा हा परिणाम आहे. सरकारच्या या आरक्षण विरोधी निती विरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला.
केंद्र सरकारला आम्ही या निवेदना मार्फत विनंती करतोत की,मेडिकलच्या पदवीधर व उच्यपदव्युत्तर सत्रातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेतील आरक्षण नाकारू नये ओबीसी समाजाला आरक्षण देऊन संधी द्यावी असी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्यासह देवदत्त सूर्यवंशी, बालाजी कांबळे, प्रदीप सोनकांबळे, विजयकुमार सूर्यवंशी,अंकुश कांबळे,पत्रकार मोहन क्षीरसागर,पत्रकार बालाजी मिलगिरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निलंगा/ मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment