कृषि विभागाच्या योजनेसाठी नेहमीच पुढाकार राहणार : श्रीमती मोदी मॅडम
कृषी विभागाच्या योजनासाठी नेहमीच पुढाकार राहणार : श्रीमती मोदी मॅडम
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : येरोळ ता. शिरूरअनंतपाळ येथील ग्रामस्थाच्या वतीने नव्याने रूजु झालेले कृषीसाहाय्यक श्रीमती मोदी ओ. आर .यांचे स्वागत तर बदली झालेले कृषी साहाय्यक ओम अंधारे यांचाही येथील मारोती मंदिरात शालश्रीफळ पुष्पगुच्छ देवुन भावपुर्ण निरोप देण्यात आला .
येरोळ येथील प्रगतशील शेतकरी माजी प्राचार्य सुर्यकांतराव येरोळकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आजी माजी कृषी साहाय्यकाचा शालश्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला . येरोळ व परिसरात कृषी विभागाच्या योजना सक्षम राबविण्यासाठी कृषी साहाय्यक ओम अंधारे यांनी मोठे योगदान दिले आहे
गावात शेतकर्याना कृषीच्या योजनेचा लाभ त्यांनी मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा केला.लाॅकडाऊनच्या काळात स्वखर्चाने सॅनीटायझर व मास्क येरोळ व परिसरात वाटप केले .शेततळे , सिमेटी बंधारे , फळबाग योजना,शेतकर्याच्या समस्या प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जावुन सोडवण्याचा त्यांचा हातखंडा होता.
त्यांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद व स्मरणार्थ राहणार असुन नवीन आलेले कृषी साहाय्यक श्रीमती मोदी आर,ओ. यांच्याकडुन देखील मोठी आपेक्षा असल्याचे पञकार शिवानंद भुसारे यांनी व्यक्त केले.
नूतन कृषी साहाय्यक श्रीमती मोदी आर .ओ. यांनी शेतकर्यासाठी असलेल्या कृषीविभागाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार असुन ग्रामस्थ व शेतकर्यांनी सहकार्य करावे अशी आपेक्षा व्यक्त केली.पांढरवाडी हाणमंतवाडी येथेही निरोप समारंभ करुन सत्कार करण्यात आला .
या निरोप समारंभास सरपंच अतुल पाटील गंभीरे गोविंद,पोतदार , शामराव, सिंदाळकर , मगेंश पाटील , सुर्यकांतराव येरोळकर , संतोष पाटील , सतिस सिंदाळकर , नंदकुमार साकोळकर , ओमप्रकाश तांबोळकर , संदिप पाटील , अब्दुल मुजेवार , गुंडेराव चौसष्टे , नूरखाॅ पठाण , राजकुमार सिंदाळकर , योगेश पालकर व गावातील प्रगतशिल शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक रवि पाटील यांनी केले तर उपस्थिताचे आभार बाबुराव वाघमारे यांनी मानले .
Comments
Post a Comment