शिरूर आनंतपाळचे सुपुत्र नागेश तोंडारे यांची उप-अभियंता पदी निवड.
शिरूरअनंतपाळचे सुपुत्र नागेश
तोंडारे यांची उपअभियंता पदी निवड.
प्रशांत तांबोळकर
शिरूर अनंतपाळ : शहरातील नागेश गुंडाप्पा तोंडारे यांची जलसंपदा विभाग यवतमाळ येथे उपअभियंता श्रेणी १ या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यामुळे शिरूरअनंतपाळ शहर व तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.
घरची परिस्थीती अंत्यत हलाखीची असताना सुध्दा नागेश तोंडारे यांनी पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जि.प.प्रशाळा शिरुर अनंतपाळ येथे तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण शहरातील अनंतपाळ नुतन विद्यालय येथे झाले आहे. व अभियांत्रीकीचे शिक्षण एम.एस. बिडवे काॅलेज लातुर येथे पुर्ण झाले आहे.
या अगोदर त्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे प्राध्यापक म्हणुन, तर नगर परीषद सांगोला येथे लिपीक म्हणुन, महावितरण कार्यालय धारुर येथे कनिष्ठ अभियंता पदी अशा विविध ठिकाणी सेवा दिली आहे व सध्या ते वाशीम येथे जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदी सेवा देत होते.
नागेश तोंडारे यांचे लहानपणीच वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे छत्र हरविले असतानाही अतीशय खडतर परस्थीतीमध्ये शिरुर अनंतपाळ सारख्या ग्रामीण भागातुन बारावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करुन आपल्या जिद्दीच्या व कष्टाच्या बळावर अभ्यास करुन मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांच्या या सर्व यशाचे श्रेय त्यांनी आपली आई सुभद्राबाई तोंडारे यांना दिले आहे.
ते सध्या जलसंपदा विभाग वाशीम येथे श्रेणी 2 या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची जलसंपदा विभाग यवतमाळ येथे उपअभियंता ( श्रेणी - 1 ) या पदावर पदोन्नती झाली असून नागेश तोंडारे यांच्या आयुष्याचा आलेख हा सतत चढता राहिला आहे.
त्यांना मिळालेल्या या पदोन्नती बद्दल काॅग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख सुधीर लखनगावे ,महादेव आवाळे , मधुकर धुमाळे , संदिप धुमाळे , दिपक धुमाळे , बस्वराज चौसष्टे , पञकार ओमप्रकाश तांबोळकर , गोविंद हंद्राळे यांच्यासह मिञ परिवार व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment