शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा "कोरोना यौद्धा" म्हणून सन्मान..
शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा “कोरोना योध्दा” म्हणुन सन्मान...
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सुपरिचित असलेल्या शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम व त्यांचे सर्व सहकारी यांचा शिरूरअनंतपाळ येथील काॅग्रेस सोशल मिडीयाचे प्रमुख सुधीरभाऊ लखनगावे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळुन आज सर्वांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सुरक्षा किट देवुन यशोचीत सत्कार करण्यात आला .
कोरोना काळात लॉकडाऊनची यशस्वी अमलबजावणी करणे हे मोठे जिकिरीचे काम असून ग्रामिण भागातील जनतेला मार्गदर्शन करुन अनेक आव्हानांना तोंड देत यशस्वी लॉकडाऊन करण्यात पोलीस यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे.
पोलीसांनाही कोरोना माहामारीचा सामना करावा लागत आहे तर शहरामध्ये काही बाहेरुन आलेले नागरिक पाजीटिव्ह सापडले त्यांना धीर देवुन न खचु देता सद्रक्षणायची भुमिका पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यात पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी महत्वाची भुमिका पार पाडली.
दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग मिळवुन त्यांनी नागरीकांचा विश्वास संपादन केला. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी झटणाऱ्या अशा कोरोना योध्दांचा सन्मान करतांना एक सामाजीक कार्यकर्ता म्हणुन अभिमान वाटत आहे असे सुधीर लखनगावे यांनी सांगितले . यावेळी मधुकर धुमाळे , महादेव आवाळे , राहुल कांबळे व सर्व मिञ परिवार उपस्थित होता.
Comments
Post a Comment