शिरूरअनंतपाळ कार्यक्षेत्रात एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार
शिरूरअनंतपाळ कार्यक्षेञात एक गाव एक गणपती संकल्पना राबविणार
-पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम
शिरूरअनंतपाळ : प्रशांत तांबोळकर
जागतीक महामारी कोरोना विषाणु संर्सग रोखण्यासाठी उपाययोजना चालु असुन प्रत्येक विभाग आपआपल्यापरीने पुर्ण क्षमतेने काम करत आहे. मार्च पासुन सुरु झालेली टाळेबंदी मध्ये आलेले सण -उत्सव या सर्व कार्यक्रमांना शासकिय नियमाप्रमाणे सर्वानी सहकार्य केले.
आता गणेशउत्सव काळात शिरूरअनंतपाळ शहरासह तालुक्यात ग्रामिण भागात कोरोना बांधीत यांची संख्या वाढत असुन या महामारिला अटकाव करण्यासाठी शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेञात येणार्या गावातील व शहरातील मंडळानी एक गाव एक गणपती हि संकल्पना साकारुन सहकार्य करतील अशी भावना पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी व्यक्त केले.
शिरूरअनंतपाळ शहर व तालुक्यात कोरोना रूग्नाची संख्या वाढत आहे . लवकर गणपती उत्सव जवळ येत असुन प्रत्येक गावात एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवण्यासाठी शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनच्या वतीने कार्यकर्त्याची बैठक आयोजीत केली होती . यावेळी एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी अशी सुचना पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी बैठकीत मांडली त्याचे सर्व कार्यकर्त्यानी स्वागत करण सहकार्य करण्याचे आश्वसन दिले.
यावेळी शिरूरअनंतपाळ येथील जेष्ट नागरिक अॅड. संभाजीराव पाटील , नगरसेवक विशाल गायचवाड , अमर देवग्रे , गणेश धुमाळे, प्रल्हाद जोशी ,मधुकर धुमाळे , महादेव आवाळे , संतोष शेट्टे ,संदिप धुमाळे , नरेंद्र शिवणे , कोरे , यांच्यासह गणेश मंडळाचे पदधिकारी उपस्थित होते . एक गाव एक गणपती हि संकल्पना चांगली असुन ती सर्वञ राबवावी अशी जनतेतुनही मागणी होत आहे .
Comments
Post a Comment