रिमझिम पावसामुळे मुगाला फुटले कोंब..हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पिकात सोडली जनावरे..
रिमझीम पावसामुळे मुगाला फुटले कोंब....
हाताश झालेल्या शेतकर्यांनी पिकात सोडली जनावरे...
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसापासुन येरोळ व परिसरात सतत पडणार्या रिमझीम पावसामुळे हाती आलेल्या मुग व उडदाला झाडावरच कोंब फुटल्याने चिंताक्रांत झालेल्या अनेक शेतकर्यांनी कोंब फुटलेल्या पिकात जनावरे सोडुन दिली आहेत.
पिकच कुजुन गेल्याने शेतकर्याच्या हाती घातलेला खर्चही निघाला नाही त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटणेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे व राष्टवादी पक्षाचे महाराष्ट्र युवाप्रदेशअध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तहसिलदार शिरूरअनंतपाळ यांना निवेदनाद्वारे केली आहे .
शिरूरअनंतपाळ तालुक्यात गेल्या दहा बारा दिवसापासुन दररोज रिमझीम पाउस पडत आहे. मृग नक्षञात पडलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्यांनी आनंदाने पेरणी केली होती. परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही त्यामुळे अनेक शेतकर्यांना दुबार व तिब्बार पेरणी करावी लागली.
आधीच लाॅकडाऊन व तीबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला होता. हाती मुगाचे तरी चार पैशे येतील म्हणुन शेतकरी आनंदात असतानाच गेल्या दहा बारा दिवसापासुन दररोज रिमझीम पाऊस पडत असल्याने परिपक्व झालेला मूग व उडीदाचा शेंगाना झाडावरच कोंब फुटल्याने शेतकर्यांना या पावसाने कंगाल करून सोडले आहे.
निराश झालेल्या शेतकर्यांनी चक्क मुग व उडदाच्या कोंब फुटलेल्या चार एक्कर मधील उभ्या पिकात सोनारवाडी ता. शिरुरअनंतपाळ येथील शेतकरी शंकर वाडकर यांनी आपली दुभती जनावरे सोडुन दिली आहेत . कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व मुग व उडीद पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे .
Comments
Post a Comment