शिरूर अनंतपाळ तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस तरुणांवर प्राणघातक हल्ला

वाळु माफीयाचा शिरूरअनंतपाळ तालुक्यात धुडगुस तरूणाला बेदम मारहान...

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी

शिरूरअनंतपाळ तालुक्यात वाळुमाफीयाची दहशत वाढली असुन महसुल विभागाशी हातमिळवणी करुण राञदिवस वाळुची तस्करी चालु आहे .असाच प्रकार डोंगरगाव ता.शिरूर अनंतपाळ येथील एका युवकावर वाळू माफियांकडून काठ्या कुऱ्हाडीने व लोखंडी सळई व चाकुने केलेल्या हल्यात युवक गंभीर जखमी झाला असून पाच आरोपीवर  शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

डोंगरगाव येथील चौकात महेश ज्ञानोबा भिंगोले वय 30 वर्षे या तरूणाला आमच्या वाळूच्या ट्रॅक्टर ची माहिती लातुर जिल्हाधिकार्‍यांना का दिलास म्हणून आरोपी सुग्रीव पवार,  हनुमंत पवार , संजय पवार , सुमित पवार, ऋत्विक पवार अदि गैरकायदयाची मंडळी जमवून लोखंडी कुऱ्हाड , चाकू , लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केल्याने महेश भिंगोंले हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

 याबाबत शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..