महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील नेटवर्क गुल..
महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील नेटवर्क गुल...
ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय.
कासारसिरसी,दि२६(बालाजी मेलगिरे)
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील अनेक कंपनीचे नेटवर्क गुल झाल्यामुळे परिसरातील कोराळी, कोराळवाडी आणि कासार सिरसीवाडी, नेलवाड यासह अनेक गावातील नागरिक परेशान तर विद्यार्थी हैराण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे नेटवर्क येत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करता येत नाही.
यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे.याभागात जिओ, एअरटेल,आयडियासह अनेक कंपनीचे टॉवर असून यापैकी कोणत्याही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित येत नसल्याने नागरिक व विद्यार्थी परेशान आहेत.
तर मार्केटमध्ये ह्या सर्व कंपन्यांनी नागरिकांना फोर जी नेटवर्क सुविधा देत आहोत असे म्हणून स्वतःचे पाट थोपटून घेत असताना दिसत आहेत.
परंतु या भागात मात्र नेटवर्क मिळत नसल्यामुळे नागरिकांच पालकांचं आणि त्यात विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.या संदर्भात वरील कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटरशी मोबाईल वरून संपर्क साधून चौकशी केली असता दुरुस्त करून घेऊ, हे वरूनच नेटववर्कचा प्रॉब्लेम आहे,असे उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे धडे ऑनलाईन मोबाईलवर, लॅपटॉपवर आणि कॉम्प्युटरवर देत आहेत परंतु या भागांमध्ये नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत संबंधित त्या-त्या कंपनी कडून त्यामधील अडचणी दूर करून सतत नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्याकडून व पालकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment