बौद्धवस्ती शेजारी केले जाणारे अंतीमसंस्कार तात्काळ थांबविण्याची मागणी..

बौद्धवस्ती शेजारी केले जाणारे अंतीमसंस्कार  तात्काळ थांबवण्याची मागणी 

निलंगा/प्रतिनिधी

कोरोणा प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर बौद्धवस्ती शेजारी केले जाणारे अंतिम संस्कार तात्काळ थांबविण्यात यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात
 आली आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा शहरात व तालुक्यातही कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक जणांचे  मृत्यू होत आहेत.मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर ज्यांच्या-त्यांच्या धार्मिक विधिनुसार अंतीमसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत.
ते खरे ही आहे.

 परंतु निलंगा शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या  पार्थिवावर निलंगा शहरातील अशोक नगर येथील बौद्ध वस्ती शेजारी  लिंगायत स्मशान भूमी आहे.या स्मशानभूमीत दि१५ऑगस्ट रोजी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

येथील लिंगायत स्मशान भूमी ही अशोकनगर(बौद्ध) वस्तीच्या अवघ्या १००फुट अंतरावर आहे.सदरचे ठिकाण हे  लोकवस्ती च्या अगदी जवळ आहे शिवाय रहदारीचे ठीकाण आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या जवळ कोरोनाबाधित व्यक्तीच्या पार्थिवदेहावर येथे अंतीमसंस्कार करणे म्हणजे बौद्ध  जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे. 

यामुळे कोरोना आजाराचा संसर्ग वाढुन जणतेच्या जिवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यापूर्वी या ठिकाणी दफन केलेले अनेक  मृतदेह  जंगली प्राण्यानी ऊकरुन बाहेर काढलेल्या अनेक घटना घडल्या आहेत.आज दफन केलेला मृतदेहही कुत्रे,घुशी जंगली प्राणी  ऊकरुन काढण्याची दाट शक्यता आहे.

 शिवाय आज करण्यात आलेल्या दफन विधीचा खड्डा हा नगर परिषदेने कमी खोलीचा करून मुरुम लोटुन झाकलेला आहे.त्या खड्ड्यावर कोणत्याही प्रकारची दबई करण्यात आली नाही,किंवा त्याच्यावर काट्या कुपाट्या ठेऊन त्याच्यावर आच्छादन पण केलेल नाही.

 हा दफनविधी अत्यंत निष्काळजीपणे केलेला आहे.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.यापुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा दफनविधी येथे करण्यात येऊ नये अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीसह,अशोक नगर, मिलींद नगर, सरस्वती कॉलनी  येथील नागरीक करीत आहेत.

अश्या प्रकारचे  दफनविधी शहरापासून दूर ठीकानी करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर वंचितचे देवदत्त सुर्यवंशी,ऍड अमोल धैर्य, प्रदिप सोनकांबळे, निकेतन गायकवाड, अमित गायकवाड, अजय सुर्यवंशी, प्रशांत सुरवसे यश कांबळे आदित्य कांबळे यांच्यासह अनेकांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..