दोन महिन्यापासून गाव अंधारात.
दोन महिन्यापासून गाव अंधारात
निलंगा,दि१०(मिलिंद कांबळे)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निलंगा तालुक्यातील पिरुपटेलवाडी हे लहानसे गाव या गावात मागील दोन महिने झाले लाईट नाही.
त्यामुळे गावकऱ्यांना अंधारामध्ये दिवस काढावे लागत आहेत.लॉकडाऊनच्या काळामध्ये पुणे-मुंबई सारख्या अनेक शहरात नोकरीसाठी,कामासाठी गेलेले लोक गावाकडे आले आहेत.
त्याचप्रमाणे लाईट नसल्यामुळे गावांमध्ये पाणीपुरवठा खंडित झालेला आहे.गावकऱ्यांमार्फत डी.पी खराब झाली असल्याची तक्रार महावितरण विभागाकडे देऊनही काहीच उपयोग झाला नाही.
सदर प्रकरणी महावितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
या गावचा परिसरात डोंगराळ असून पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे जंगली प्राणी रानडुक्कर,वानर तसेच सापाची भीती जास्त आहे.
या गावांमध्ये दोन महिने झाले लाईट नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत महावितरण च्या सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदरचा प्रकार निदर्शनास आणून देऊनही काहीच उपयोग झाला नाही.
आमची कुणीही दखल घेत नसल्याचा आरोप केला जात आहे.
लवकरात लवकर डी पी व वायरिंग बसवून अंधारात असलेल्या गावाला लाईटची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केले जात आहे. गावामध्ये लाईट नसल्याने गावातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणा पासून वंचित राहत आहेत.
पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही असा आरोप गावकऱ्यां तर्फे मौला पटेल यांनी केली आहे.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment