निलंगा नगरपालिका हतबल रहिवाशी श्याम लोकरे यांनी केला स्वखर्चातुन रस्ता

नगरपालिका हतबल : रहिवासी श्याम लोकरे यांनी केला स्वखर्चातून रस्ता 
निलंगा नगर पालिकेच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे,पालिका नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरल्याने येथील सुज्ञ तथा जागृत नागरिक श्याम लोकरे यांनी स्वखर्चाने पुढाकार घेऊन रस्ता बनवत पालिका प्रशासनास चपराक दिली आहे.
सदर प्रकाराबाबत अधिक वृत्त असे की निलंगा नगर परिषेदेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील  दादापीर दर्गा भागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या  नागरिकांना नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत, नागरिकांनी नगर पालिकेचे पदाधिकारी तसेच पालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी करत होते, परंतु या मागणीला नेहमीच टोलवाटोलवी करण्यात आली, हे काम न झाल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.
नागरिकांना पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला होता.या रस्त्यावरून नागरिकांना वृद्धांना ,दुचाकी स्वारांना व इतर वाहनांना रहदारी करताना कसरत करावी लागत होती, याबाबत येथील नागरिकांनी अनेकवेळा येथील नगरसेवक व नगराध्यक्ष यांना रस्त्याबाबत विनवण्या करून सुद्धा या भागाकडे दुर्लक्ष करून रस्ते केलेच नाहीत.
शेवटी या भागातील नागरिक श्याम लोकरे यांनी येथील रस्त्याची दुर्दशा पाहून नागरिकांच्या अडचणी पाहून स्वखर्चाने नियोजन करून अंदाजे पाचशे फुटाच्या रस्त्यावर दगड मुरूम टाकून सद्यातरी रहदारी योग्य रस्ता बनवला आहे. यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले तर नगर पालिकेच्या भोंगळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.याबाबत आता निष्क्रिय नगर अध्यक्षांना जणांची नाही तरी मनाची वाटते का?असा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..