नांदेड परिक्षेत्राचे नवे महानिरीक्षक निसार तांबोळी यांची नियुक्ती..
नांदेड परिक्षेत्राचे नवे महानिरीक्षक निसार तांबोळी यांची नियुक्ती
---------------------------------------------------
शिरूरअनंतपाळ तालुक्यात जल्लोश...
---------------------------------------------------
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : एक डॅशीग ऑफिसर म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजविली असे शिरूर अनंतपाळ तालुक्याचे सुपुञ निसार तांबोळी यांची नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून आज नियुक्ती करण्यात आल्याने शिरूरअनंतपाळ व परिसरात त्यांच्या मिञमंडळी व ग्रामस्थाकडुन आनंद व्यक्त केला जात आहे . निसार तांबोळी यांचे शिक्षण परभणी येथे झाले. हिंगोली पासून आपल्या पहिल्या नोकरीची सुरुवात त्यांनी केली. एक पारदर्शक अधिकारी अशी त्यांची प्रतिमा असून त्यांनी महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपले पदभार स्विकारले. मुंबई, ठाणे अश्या महत्त्वपूर्ण ठिकाणी त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असा त्यांचा दंडक असून गरिबीची जाण असलेला ग्रामिण भागातील एक अधिकारी या परिक्षेत्राला मिळाला आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली अश्या चार जिल्ह्याचा स्वतंत्र कारभार ते पाहतील. त्यांनी अनेक पदाचा कारभार सांभाळताना कुणावरही अन्याय होणार नाही अशीच भूमिका घेतली, अनेक प्रलोभने धुडकावून लावत एक सजग अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे . आपल्या भागात त्यांची होणारी दमदार एन्ट्री नक्कीच गुन्हेगारीला कर्दनकाळ ठरणार आहे. अत्यंत उच्च विद्याविभूषित असलेले हे कुटुंब नक्कीच ग्रामीण संस्काराचा पगडा त्यांच्यावर आहे. हिंगोली, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, लातूर अश्या ठिकाणी त्यांनी अनेकांच्या मुसक्या बांधण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेल्या निसार तांबोळी यांची दमदार एन्ट्री नक्कीच या भागातील गुन्हेगारी क्षेत्राला नवी दिशा देईल,अशी अपेक्षा त्यांच्या मिञ परिवारानी व्यक्त केली आहे .
Comments
Post a Comment