डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे देहावसन भक्तांवर शोककळा...
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे देहावसान भक्तांवर शोककळा...
प्रविण तांबोळकर
अहमदपुर : वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे मागील काही दिवसापासुन नांदेड येथील रुग्णालयात उपचार घेत होते.त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.आज दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे देहावसान झाले असुन त्यांच्या भक्तांवर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसापासुन वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे संजीवनी समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती.त्यामुळे अहमदपुर येथील त्यांच्या भक्तीस्थळावर मोठया प्रमाणात एकच गर्दी झाली होती.दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
महाराजांची काल पासुन प्रकृती अचानक चिंताजनक होती अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली.गुरुवर्यांचे महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्यांचा मोठा भक्त वर्ग असुन त्यांच्या भक्तासांठी मोठा धक्का मानला जात आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भारतरत्न द्यावे अशी मागणी केली होती.तर अहमदपुर येथील त्यांच्या भक्तीस्थळास नव्यानेच त्यांच्या संमतीने ट्रस्टी नेमण्यात आले होते.
अखेरचा श्वास घेताना महाराजांचे वय १०४वर्षे होते. डाॅ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे अध्यात्माबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशात लाखो शिष्य मंडळी आहे.
Comments
Post a Comment