गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे - -सुरजदादा चव्हाण
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे
-सुरजदादा चव्हाण
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : देशात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याची काळजी घेतली पाहीजे. तसे झाले तर या सर्वांच्या एकजुटीतून शक्ती निर्माण होईल. त्याच्यातून देशाचा सर्वांगिण विकास होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यअध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांनी केले.
येरोळ येथे दहा वर्षापासुन प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे म्हणुन लातुर जिल्हा परिषद मध्ये ठराव होऊनही राजकिय हेवादेव्यातुन हा ग्रामिण भागातील गोरगरिबाच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न प्रलंबीत होता . परंतु ग्रामस्थांनी महाराष्ट्र राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे युवा प्रेदशअध्यक्ष यांना मुंबई येथे भेटुन येरोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरु करावे म्हणुन निवेदन दिले होते.
याची दखल घेवुन त्यांनी संबधीत आरोग्यमंञी टोंपे यांच्याकडुन प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी करून घेतली . त्याबदल येरोळच्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अतुल पाटील गंभीरे , मैनोदिन मुजेवार , शावसेनेचे रविनाथ महाराज तांबोळकर , शिवाजी तांबोळकर , हंसराज बिरादार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते .
जागेची पाहणी....
याचवेळी सुरज दादा चव्हाण यांनी येरोळ येथे होणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी लागणार्या जागेची पहाणी केली . व लवकरच आरोग्य विभागाचे डाॅक्टर व कर्मचारी सेवा देतील असे आश्वसन दिले . यावेळी अजीज मुल्ला , बाळासाहेब पाटील , बाबासाहेब पाटील डिगोळकर , योगेश बिरादार , बालाजी भालेकर , जहरुदिन शेख , नंदकुमार तांबोळकर , लक्ष्मण बिरादार , व परिसरातील नागरिक उपस्थित होते .
Comments
Post a Comment