गौतम सूर्यवंशी(माळेगावकर) यांच अपघातात निधन
गौतम सूर्यवंशी(माळेगावकर) यांच अपघातात निधन
मौजे माळेगाव(जे)ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले गौतम सोपानराव सूर्यवंशी,माळेगावकर (जे) यांच मोटारसायकल अपघातात निधन झाले.
ते काल दि १४ सप्टेंबर २०२० वार सोमवार रोजी सायंकाळी आपले काम आटोपून गावाकडे जात असतांना मोटार सायकल रस्त्यात स्लीप होऊन खड्यात पडल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते.
पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.मृत्यू समयी ते ५२वर्षाचे होते.ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सेक्रेटरी म्हणून काम पाहत होते.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या स्वतः च्या शेतात अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी एक सुन असा परिवार आहे.ते वंचित बहुजन आघाडीचे दत्ता सूर्यवंशी(माळेगावकर) यांचे चुलते होत.
Comments
Post a Comment