येरोळ येथे डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण आदरांजली
येरोळ येथे डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली .
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ : येरोळ व परिसरात सर्वांच्या हृदयात असलेले वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमुदपुरकर यांच्या प्रतिमेला येरोळ येथील हावगीस्वामी मठामध्ये श्रध्दांजली वहाण्यात आली .
लिंगायत धर्माचे अध्यात्मीक असलेले गुरुवर्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी वध्दपकाळाने निधन झाले त्यांना श्रद्धांजली म्हणून येरोळ येथील हावगी स्वामी मठात येरोळ येथील ग्रामस्थाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
यावेळी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा व आरती करण्यात आली व त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून पाच मिनिट मौन पाळुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . या श्रदांजली कार्यक्रमाला गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते . या वेळी शि.भ.प, महादेव वामी येरोळकर , शि.भ.प, बालाजी महाराज येरोळकर , ह.भ.प. निवृत्ती महाराज जांभळवाडीकर , सुर्यकांत गुरूजी येरोळकर , वैजीनाथ तोंडारे , शिवकुमार साकोळकर , गणेशप्पा स्वामी महाराज , राजकुमार सिंदाळकर , पञकार ओमप्रकाश तांबोळकर , शिवानंद भुसारे , रवि पाटील , शिवाजी तांबोळकर , हानमंत पालकर , सुनिल बरदाळे , रविनाथ महाराज तांबोळकर , बाबुराव तोडांरे व रामाण्णा चौसष्टे यांच्यासह आप्पाचे सर्व शिष्यगन उपस्थित होते .
Comments
Post a Comment