आजही माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती उपविभागीय अधिकारी विकास माने

आजही माणुसकी जिवंत असल्याची अनुभूती !!
उपजिल्हाधिकारी विकास माने

प्रशांत तांबोळकर

शिरूरअनंतपाळ : कुठेही अपघात झाला, तर त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो काढणे अथवा त्या घटनेचे चित्रीकरण करण्याची मानसिकता अनेकदा दिसून येते. परंतु मुसळधार पाउस पडल्यामुळे घरणी नदीच्या पुरामध्ये वाहुण जाणार्‍या एका युवकाला स्वताच्या जीवाची पर्वा न करता वाचविणार्‍या तरुणाचा शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात उपजिल्हाधीकारी विकास माने , तहसिलदार अतुल जटाळे व पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते शालश्रीफळ पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देवुन  सत्कार करण्यात आला .

   लक्कडजवळगा येथील तरुण शिध्देश्वर गौतम सुर्यवंशी हा आपल्या मोटार सायकलवरुन शिरुरअनंतपाळ येथील कामकाज करुण गावी जात होता. परंतु सोमवारी चार वाजता पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरणी नदी पाण्याने ओंसुंडुन वहात होती . त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो मोटारसायकलसह वाहुन  जात असल्याचे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी पाहुण आरडाओड केली. याची माहीती कुणीतरी पोलीसस्टेशला पण कळविली. परंतु वहात्या पाण्यात जीव धोक्यात घालुन पोहणारा कुणीही नव्हता.
 पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम व शिरूरअनंतपाळ येथील तरुण पिंन्टु मादळे यांनी जीवाची पर्वा न करता रश्शीच्या द्वारे वहात्या पाण्यात जावुन वाहणार्‍या त्या युवकाला बाहेर काढले . 

स्वताच्या जीवाचा कोणताही विचार न करता केवळ माणुसकीच्या नात्याने मदत करणारे पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम व पिन्टु मादळे  हे आज मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीसाठी आदर्शवत ठरतात. त्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका वाहुण जाणार्‍या तरुणाचे प्राण वाचले असे उदगार उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी तरुणाचा सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले .

    यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन सामाजीक कार्यकर्ते माधराव आवाळे यांनी केले . यावेळी तलाटी गणेश राठोड , तलाटी भारती , जमादार सारोळे , सामाजीक कार्यकर्ते सुधीर लखनगावे , मधुकरआण्णा धुमाळे , संदीप धुमाळे , सुमतीनंदन दुरुगकर , शिध्दलिंग डिगोळे , नवाझ चौधरी . पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते . उपस्थिताचे आभार पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..