लातुरात धनगर आरक्षणासाठी ढोल बजाव आंदोलन
- Get link
- X
- Other Apps
लातुरात धनगर आरक्षणासाठी ढोल बजाव आंदोलन
लातूर,दि.२५(मिलिंद कांबळे)
धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात धनगर समाजाचे ढोल बजाओ.आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
लातुरात सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलनाची सुरूवात झाली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आले. तत्पूर्वी धनगर समाजाच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल बजाव..सरकार जगाओ आंदोलनास सुरूवात करण्यात आले.
या आंदोलनात सकल धनगर समाजाच्या वतीने समन्वयक अनिल गोयकर,देवा गडदे,राहुल पाटील,अतिश बैकरे, सदाशिव भिंगे,युवराज जोगी इत्यादीसह अनेक धनगर समाज बांधव उपस्थित होते.
लातूर/मिलिंद कांबळे
मो 9960049411
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment