नदीकाठच्या पिकांचे पंचनाम्याचे आदेश अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठेंगा

केवळ नदीकाठावरील पिकाचे पंचनामाचे आदेश
अतीवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रशासनाचा ठेंगा..

सरसगट पंचनामे करावेत तहसिलदाराना निवेदन...

प्रशांत तांबोळकर

शिरूरअनंतपाळ : सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतीवृष्टीत केवळ नदीकाठ व ज्या मंडळात अतीवृष्टी झाली तेथील नुकसानग्रस्त पिकाचेच पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असुन इतर गावातील पिकाचे नूकसान झालेल्या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याचे दिसुन येत असुन शासनाने सरसगट पंचनामे करून शेतकर्‍याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येरोळ येथील सरपंच अतुल पाटील गंभीरे व परिसरातील शेतकर्‍यानी तहसिलदार शिरूरअनंतपाळ यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे .

यावर्षी शिरूरअनंतपाळ तालुक्यात मृगनक्षञामध्ये पेरणी करण्यात आली .परंतु शेतकर्‍याचा अज्ञानाचा फायदा घेत सोयाबीन कंपन्यानी बोगस बियाणे देवुन शेतकर्‍याची फसवुणुक केली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना दुबार तिब्बार पेरणी करावी लागली . त्यानंतर समाधान कारक झालेल्या पावसामुळे मुग व उडदाचे पिक बहरले . परंतु ऐन काढणीच्या वेळस सतत पाऊस पडल्याने हाततोंडाशी आलेला घास मुगाला कोंब फुटल्याने निर्सगाने हिरावुन घेतला . मुग नूकसानीचा पंचनामा व मदत अद्यापही शासनाने दिली नाही . ना कोणत्याही पिकाची पहाणी केलेली नाही . शिरूर अनंतपाळ तालुक्यात नगदी पैशाचे पिक म्हणुन अनेक शेतकर्‍यांनी उसाचे क्षेञ मोडुन सोयाबीनची पेरणी केली. यावर्षी दुबार तिब्बार पेरणी करून नाराज झालेल्या शेतकर्‍यांना सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल अशी आपेक्षा होती . परंतु गेल्या पंधरा दिवसापासुन अतीवृष्टी व सततचा पाउस पडल्यामुळे सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटले तर काही ठिकाणी रानात पाणी थांबल्याने सोयाबीन सडले . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सरसगट पंचनामे करून राज्य सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करेल अशी शेतकर्‍याची आपेक्षा होती. परंतु प्रशासनाने साकोळ मंडळातील नुकसान झालेल्या येरोळ तलाटी सज्जातील येरोळ , पांडरवाडी , सुमठाणा , डिगोळ , जांभळवाडी , हानमंतवाडी हि गावे वगळली आहेत.  या गावामधील सोयाबीनचा पेरा जास्त असुन अतीवृष्टीने रानात पाणी थांबुन सोयाबीनचे पुर्ण नुकसान झाले आहे . प्रशासनाने सरसगट नूकसानीचे पंचनामा आदेश द्यावेत अशा मागण्याचे निवेदन तहसिलदार शिरूरअनंतपाळ यांना देण्यात आले आहे . यावेळी सरपंच अतुल पाटील गंभीरे , शिवकुमार साकोळकर , बालाजी भालेकर , शंकर वाघमारे , विश्वनाथ गंभीरे , गुंडेराव सिंदाळकर , पंडीत तांबोळकर , शिवशंकर तांबोळकर , बालाजी झटे , राजेंद्र चेबाळे , भिमराव माकणे , सुधीर येरोळकर , बालाजी पिचारे ,बाबुराव वाघमारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..