निलंगा नगर पालिकेकडून रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट ?
निलंगा नगर पालिकेकडून रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट ?
निलंगा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेली रमाई घरकुल आवास योजना ही मागासवर्गीय लोकांचा विकास व्हावा ते ही इतर लोकांच्या बरोबरीने सन्मानाने जीवन जगावे त्यांचेही जीवनमान उंचीमान व्हावे याकरिता सदर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे अनेकजण लाभार्थी आहेत.
लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद जाणीवपूर्वक या योजनेपासून अनेक मागासवर्गीय जनतेला वंचित ठेवण्यासाठी, ज्या लाभार्थ्यांना (मागासवर्गीय) रमाई घरकुल आवासा योजनेचे घरकुल मंजूर झाले आहे.अश्या गरीब अर्थात आर्थिक हतबल असलेल्या लाभार्थ्यांकडून निलंगा नगर परिषेद बांधकाम परवानाच्या नावाखाली आर्थिक लूट करीत आहे.जर का कोणी विचारणा केलीच तर त्यांना बांधकाम परवाण्यासाठी खालील अटींची पूर्तता करावी लागेल असे सांगितले जाते.त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. तपासणी शुल्क,विकास शुल्क पॉईंट.५% ,बांधकाम शुल्क,सुरक्षा रक्कम,बिल्डिंग परमिट शुल्क,आकृषी कर,स्टाकिंग चार्ज,राडा रोडा चार्ज या बाबीखाली अनेक लाभार्थ्यांना वेगवेगळ्या नियमानुसार मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत करीत आहेत.
हे सर्वस्व चुकीचे आहे.मागील सहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनता त्रस्त आहे,जनतेची आर्थिक घडी कोलमडली आहे.शिवाय या योजनेचा लाभ घेणारी जनता ही निव्वळ गरीब जनता असून यांच्याकडे परिवारातील लोकांच्या दोन वेळेच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे.
अश्या लाभार्थ्यांना एका घरकुला साठी कमीत कमी दहा हजार व ज्यास्तीत ज्यास्त पंधरा ते पंचवीस हजारापेक्षा ज्यात रक्कम भरावी लागत आहे.
सदरची रक्कम नाही भरली तर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे लाभार्थी आपल्या स्वतः च्या हक्कापासून वंचित राहत आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सामान्य जनतेची निलंगा नगर पालिकेकडून होत असलेली आर्थिक लूट थांबवून लाभार्थ्यांना रमाई घरकुल आवास योजनेसाठी विनामूल्य बांधकाम परवाना उपलब्ध करून देण्यात यावा. व आतापर्यंत रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून बांधकाम परवाण्यासाठी जी रक्कम वसूल करण्यात आली आहे.ती रक्कम लाभार्थ्यांना परत करण्यात यावी.
अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावावर युवराज जोगी, विजयकुमार सूर्यवंशी,बालाजी कांबळे ,देवदत्त सूर्यवंशी,दत्तात्रय सूर्यवंशी,नंदाबाई गाडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मिलिंद कांबळे निलंगा
मो .9960049411
Comments
Post a Comment